ब्रेकिंग - इचलकरंजीतील त्या कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू

corona positive women dead in kolhapur ichalkaranji
corona positive women dead in kolhapur ichalkaranji

इचलकरंजी : शहरात काल कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या भाजीविक्रेत्या महिलेचा आज मृत्यू झाला. यामुळे शहरातील कोरोना बाधित मृत्यू झालेल्या रुग्णांचा संख्या चार वर पोहोचली आहे तर  बाधित रुग्णांची संख्या आता 54  वर गेली आहे. 

शहरात काल सायंकाळी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये एक यंत्रमाग कामगार, एक यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या एक नातेवाईक तसेच एका भाजीविक्रेत्या महिलेचा समावेश होता. भाजी विक्री करणाऱ्या महिलेची प्रकृती चिंताजनक होती. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यान यामुळे शहरातील कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या चार वर पोहोचली आहे. यापूर्वी कोले मळा परिसर, कुडचे मळा परिसर, तसेच त्रिशूल चौक येथील  बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

शहरातील रुग्णांची संख्या आता ५४ वर पोहोचली आहे. यामध्ये कुडचे मळा कनेक्शनमधून 32 रुग्ण तर त्रिशुल चौक कनेक्शन मधूनआठ रुग्ण आहेत. यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 44 वर पोहोचली आहे. पहाटे आलेल्या अहवालात राजकीय घराण्यातील दोघांना कोरोना चा संसर्ग आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com