गडहिंग्लज शहरात कोरोना रिकव्हरी रेट 74 टक्के

Corona Recovery Rate In Gadhinglaj City Is 74 Percent Kolhapur Marathi News
Corona Recovery Rate In Gadhinglaj City Is 74 Percent Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढता असला तरी बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. शहरात 74, तर ग्रामीण भागात 64 टक्के रिकव्हरी रेट आहे. वेळीच आणि कमी लक्षणे असतानाच उपचार सुरू झाले, तर बरे होण्यात कोणतीच अडचण नसल्याचेच हे उदाहरण आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी वाढलेला मृत्यू दरसुद्धा सध्या घटला आहे. कोरोनाची भीती मनात असली तरी जनजागृतीमुळे नागरिकांचा खबरदारी घेऊनच वावर सुरू असल्याचे चित्र आहे. 

मे व जून महिन्यात शहरासह तालुक्‍यात अगदी अल्प असलेला कोरोना संसर्ग जुलैपासून वाढू लागला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये, तर स्थानिक संसर्ग वाढल्याने शहर आणि तालुक्‍यात रुग्णांची संख्या दीड हजारी पार केव्हा झाली हेसुद्धा कळाले नाही. एकीकडे वाढत्या कोरोना संसर्गाची चिंता व्यक्त होत असताना दुसऱ्या बाजूला बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. तालुक्‍यातील ग्रामीण भागात 28 सप्टेंबरअखेर 1361 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 865 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गडहिंग्लज शहरात 29 सप्टेंबरअखेर 463 रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील 342 जण बरे झाले आहेत. केवळ 101 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातीलही 55 जण घरीच उपचार घेत आहेत. 

वेळीच उपचार सुरू झाले तर रुग्ण लवकर कोरोनामुक्त होण्यात अडचण नसल्याचेच चित्र समोर आले आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता किरकोळ लक्षणे असले तरी तपासणीसाठी पुढे येण्याची गरज आहे. घरीच स्वतंत्र खोली व शौचालय, बाथरूम असेल तर घरातच राहून कोरोनाला हरविणे शक्‍य असल्याचेही अनेक उदाहरणांनी स्पष्ट झाले आहे. मध्यंतरी शहर व तालुक्‍यात मृत्यू दरही वाढलेला होता. त्यातही इतर व्याधीग्रस्तांच्या मृत्यूची संख्या अधिक होती. कोरोनाला घाबरून जीवाला मुकल्याचेही अनेक उदाहरणे समोर आले आहेत.

केवळ कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. यामुळे कोरोनाला न घाबरता धीराने आणि प्रचंड इच्छाशक्तीने त्यावर मात करता येते, या विश्‍वासाने कोरोनाला सामोरे गेल्यास निश्‍चितच संबंधित व्यक्ती यातून सुखरूप बाहेर पडू शकते. सध्या मृत्यूदरही घटलेला आहे. गेल्या आठवडाभरात एकाही मृत्यूची नोंद तालुक्‍यात झालेली नाही. 

गडहिंग्लज शहरातील कोरोना आलेख 
- मे : 00 
- जून : 04 
- जुलै : 33 
- ऑगस्ट : 114 
- 29 सप्टेंबरअखेर : 302 

* गडहिंग्लज ग्रामीणचा कोरोना आलेख 
- मे : 72 
- जून : 31 
- जुलै : 153 
- ऑगस्ट : 259 
- 29 सप्टेंबर अखेर : 859

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com