esakal | Marathi News Latest & Breaking | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या | eSakal.com
sakal

बोलून बातमी शोधा

Corona report of dead woman negative but village people not supported Funeral this woman

कोरोना अहवाल निगेटिव्ह असून देखील कोरोनाच्या धास्तीने अंत्यविधी होण्यास विलंब

धक्कादायक - तिचा अहवाल निगेटिव्ह मात्र मृतदेह तब्बल अकरा तास घरीच

sakal_logo
By
साईनाथ पाटील

हळदी  (कोल्हापुर) : कोरोना झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे तुच्छतेने बघण्याचा दृष्टिकोन बळावत असतानाच बाधित व्यक्तीच्या घरातील एखादी व्यक्ती मयत झाली आणि ती मयत व्यक्ती कोरोना बाधित नसली तरी त्याचा मृतदेह देखील उचलण्यास कुणी तयार होत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार कोथळी (ता. करवीर) गावामध्ये आज घडला.

हेही वाचा -कोल्हापूर जिल्हा कोरोनासाठी ऑन हाय अलर्ट -


गावातील एका ६० वर्षीय महिलेचे काल मध्यरात्री बाराच्या सुमारास निधन झाले. निधन झाल्याची बातमी पहाटे गावात समजली पण कोरोनाच्या भीतीने  दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा पर्यंत महिलेचा मृतदेह घरातच होता. मृत महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता पण तिच्या घरातील इतर पाच लोक चार दिवसापूर्वी कोरोना बाधित आलेत. ते सध्या विविध कोविड केंद्रांवर उपचार घेत आहेत. परिणामी आपल्यालाही कोरोनाची लागण होईल या भीतीने मृतदेह उचलण्यास गावातील कोणीच पुढे झाले नाही.


हेही वाचा - ‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती राणेंची प्रतिक्रिया -

नंतर ग्राम प्रशासन कडून महिलेला स्मशान भूमीत घेवून जाण्यासाठी आरोग्य विभागाकडे  रुग्णवाहिकेची मागणी केली. पण  मृत महिला कोरोना बाधित नसल्याने ग्रामपातळीवरच नियोजन करा असे सांगून आरोग्य विभागाने रुग्णवहिका देण्यास नकार दिला. शेवटी व्हाईट आर्मी शी संपर्क केला असता त्यांनी होकार दिला. तब्बल अकरा तासाने व्हाईट आर्मी व आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व खबरदारी घेत मृतदेह स्मशानभूमीत पोहोचविला.  स्मशान भूमीत व्हाईट आर्मी च्या जवानांकडूनच प्रेताला अग्नी दिला. सुरक्षेच्या कारणास्तव अंतर ठेवून राहणे योग्य असले तरी कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींचा मृतदेह उचलण्यास देखील कोणी तयार न होणे हि गोष्ट चिंताजनक आहे. मृत शरीर तब्बल अकरा तास घरीच ठेवण्याची घटना मनाला वेदना देणारी असून हा प्रकार नक्कीच धक्कादायक आहे.

संपादन ‌- अर्चना  बनगे  

go to top