गडहिंग्लजमधील  "ते' डॉक्‍टर झाले कोरोनामुक्त

Corona Report Of Doctors Found Infected In Gadhinglaj Negative Kolhapur Marathi News
Corona Report Of Doctors Found Infected In Gadhinglaj Negative Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : तालुक्‍यात सहा जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले. शहरातील दोघे, कौलगेतील तिघे तर करंबळीतील चार वर्षाच्या मुलाचा यात समावेश आहे. यामध्ये कौलगेतील रूग्ण द्वितीय संपर्कातील असून स्थानिक आहेत. परिणामी, समूह संसर्गाचा धोका असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. दरम्यान, 30 जूनला राजेंद्र प्रसाद रोड परिसरातील बाधित आढळलेले डॉक्‍टर कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज घरी सोडल्याचे सांगण्यात आले.

काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात गडहिंग्लजमधील पती-पत्नी बाधित आढळले. दोन मुलांसह हे दाम्पत्य 29 जून रोजी एका ट्रॅव्हल्समधून मुंबईहून गडहिंग्लज आले आहेत. हे कुटूंब शहरातील एका लॉजमध्ये क्वारंटाईन होते. दाम्पत्याची दोन्ही मुले निगेटीव्ह आहेत. कौलगे येथे आज सायंकाळच्या अहवालात तिघे जण पॉझीटीव्ह आले.

गेल्या आठवड्यात बाधित आढळलेल्या वृद्धेच्या घरातील हे तिघेही आहेत. त्यात 40 वर्षीय सून, 15 वर्षीय नात आणि 11 वर्षाच्या नातूचा समावेश आहे. काही दिवसापूर्वी मुंबईहून मुलासह एक महिला करंबळी गावी आली आहे. तीन दिवसापूर्वीच्या त्या महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. ती गरोदर माता आहे. तिच्या संपर्कातील तिचाच अडीच वर्षाचा मुलगा आज बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, करंबळी येथील बाधित महिलेच्या संपर्कात आलेले रिक्षाचालक, ट्रॅक्‍सचालक, संबंधित महिलेचे कुटूंबिय आणि ट्रॅक्‍सचालकाने गारगोटीला भाडेकरू म्हणून घेवून गेलेल्या एका कुटूंबाला क्वारंटाईन केले आहे. एका बाधित महिलेच्या संपर्कातून 21 जणांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. 

"आयसीयू' कनेक्‍शनचे 15 रुग्ण 
गडहिंग्लजमधील आयसीयूतील नऊ कर्मचारी बाधित आढळल्यानंतर कालच तेथील वॉर्ड बॉय पॉझीटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील आणखीन दोघे बाधित आहेत. काही दिवसापूर्वी पॉझीटीव्ह आलेल्या कौलगेची वृद्धाही त्याच आयसीयूत दाखल होती. तिच्या घरातील आज सून व दोन नातवंडे पॉझीटीव्ह आले आहेत. यामुळे आयसीयू कनेक्‍शनमधील बाधितांची संख्या 15 वर पोहचली आहे.

संपादन ः सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com