गडहिंग्लजला लसीकरण तिपटीने वाढले! 

Corona Vaccination Accelerated In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Corona Vaccination Accelerated In Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : सुरवातीच्या टप्प्यात रेंगाळलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आता चांगलीच गती घेतल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांत लसीकरणात तिपटीने वाढ झाली आहे. गडहिंग्लज तालुक्‍यात दररोज सरासरी तीन हजार जणांचे लसीकरण होत आहे. लसीकरण केंद्रांची वाढविलेली संख्या आणि प्रशासन-पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोना योद्‌ध्यानंतर 60 वर्षांवरील नागरिक व 45 वर्षांवरील व्याधिग्रस्तांना प्राधान्याने लसीकरण सुरू केले; पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. लसीबाबत निर्माण झालेले गैरसमज, यंत्रणेतील त्रुटी याला कारणीभूत होत्या. अशातच 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण सुरू केले. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या कमालीच्या गतीने वाढू लागली. त्यामुळे लसीकरण मोहिमेला गांभीर्याने घेतले आहे. गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन लसीकरणाबाबत जागृती सुरू आहे. अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका गृहभेटी देत आहेत. लसीकरणाचे फायदे, घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करताना ऑनलाईन नोंदणीही करून घेतली जात आहे. 

याशिवाय आरोग्य विभागाने 31 आरोग्य उपकेंद्रांत लसीकरण सुरू केले. या वाढविलेल्या केंद्रांचीही लसीकरणाचे आकडे वाढण्यास मदत होत आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत दिवसभरात 500 ते 600 नागरिकांचे लसीकरण होत होते. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केल्याने या आकड्याने हजारी पार केली. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यामध्ये तिपटीने वाढ झाली आहे. आता दररोज तीन हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण होत आहे. ही गती अशीच कायम राहिल्यास येत्या दहा दिवसांत 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

ज्येष्ठांची आघाडी... 
लसीकरणाबाबत ज्येष्ठ नागरिकांत विविध गैरसमज पसरले होते. त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, आता ज्येष्ठांनीच आघाडी घेतल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 45 वर्षांवरील नागरिकांच्या तुलनेत दररोज 150 ते 200 ज्येष्ठ नागरिकांचे अधिक लसीकरण होत आहे. 

दृष्टिक्षेपात आकडे... 
दिवस*45 ते 60 वयोगट*60 वर्षांवरील*एकूण 
2 एप्रिल*640*622*1262 
3 एप्रिल*512*631*1143 
4 एप्रिल*259*222*481 
5 एप्रिल*1458*1637*3095 
6 एप्रिल*1516*1078*2594 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com