कोल्हापुरात छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा 

coronation day of chhatrapati sambhaji raje in kolhapur
coronation day of chhatrapati sambhaji raje in kolhapur

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांचा 341 वा राज्याभिषेक दिन संभाजी ब्रिगेडतर्फे शिवाजी चौक येथे साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला. 

करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, "महावितरण'चे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, विभागीय नियंत्रक राज्य परिवहनचे रोहन पलंगे, महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उप अभियंता हर्षद घाडगे, वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक अरविंद महाजन, अश्विन वागळे, अजय शिंदे, अनिल पाटील, प्रशांत सासणे, शाहिर राजू राऊत, शाहीर दिलीप सावंत आदी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी स्वागत केले. क्षात्र पुरोहित रामदास पाटील यांनी सत्यशोधक पद्धतीने राज्याभिषेकाचे सर्व संस्कार केले. 

श्री. पाटील म्हणाले, ""15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी 15 ऑगस्ट रोजी संभाजी महाराज आग्रावरून सुटलेला दिवस आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. यादिवशी पन्हाळा प्रांत स्वतंत्र राजधानी म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना स्वतंत्र अधिकार दिलेला दिवस आहे. पन्हाळा गड तत्कालीन स्वतंत्र राज्यकारभाराची राजधानी होती.'' 

हा सोहळा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या फेसबुक पेज वरून लाईव्ह केला. अभिजीत भोसले, भगवान कोईगडे, अभिजीत कांजर, आसिफ स्वर, निलेश सुतार, संदीप यादव, दत्ता चौगुले, संताजी घोरपडे, अरुण जकाते, सातापा आस्वले, कृष्णा नवघरे, सच्चिदानंद गुरव, संतोष खोत, सागर गुरव आदी उपस्थित होते. 

दरम्यान, पापाची तिकटी येथे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान, जमजम फाउंडेशन, सर्वधर्मीय ऐक्‍य समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन साजरा झाला. ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. दत्ताजीराव कवाळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आर्किटेक्‍चर रणजीत निकम, क्रांतिगुरू लहुजी साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, जमजम फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी फिरोजभाई सतारमेकर आदी उपस्थित होते.  

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com