'या प्रवाशाला' तोंडाला मास्क लावने पडले महागात...

coronavirus impact in kolhapur marathi news
coronavirus impact in kolhapur marathi news

चुये (कोल्हापूर) : दुबईमधून आलेल्या भुदरगड तालुक्‍यातील एका प्रवाशाला इस्पुर्ली येथे एसटी बस थांबवून तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात आणले. दरम्यान, प्रवाशाला थांबवण्यासाठी नाकाबंदी करावी लागली; मात्र या प्रवाश्याची मुंबईत सर्व तपासणी केली असल्याचे सांगितल्यानंतर प्रवाशांसह आरोग्य अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

पुण्यामध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातही दक्षता घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनकाडून खबरदारीच्या उपाय-योजना केल्या जात आहेत. आज कोल्हापूर-गारगोटी मार्गावर नाकाबंदी करून इस्पुर्ली आरोग्य केंद्राने संशयित प्रवाशाला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, बसमध्ये दुबईहून आलेला प्रवासी असल्याचे लक्षात येताच प्रवासी घाबरले; पण त्याची सर्व चौकशी मुंबई येथे झाली होती. अशी माहिती मिळाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

तोंडाला मास्क, क्‍लोज पडले महागात 

तोंडाला मास्क, क्‍लोज साहित्य झाकलेले अशा अवस्थेतील प्रवाशाला बघून अन्य प्रवासी घाबरले. दरम्यान, त्यातीलएच काही प्रवाशांनी या प्रवाशाची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवली नियंत्रण कक्षाने संबंधित मार्गावरील आरोग्य केंद्र आणि पोलिस ठाण्यांना सूचना दिली. इस्पुर्ली (ता. करवीर) येथील येथे नाकाबंदी करून पोलिसांनीही बस थांबवली सर्व प्रवाशांना खाली उतरून नंतर संशयित प्रवाशाला रुग्णवाहिकेतून आरोग्य केंद्रात आणले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com