आनंदोत्सवावर विरजन ; यंदा गौराईची गीते अडकली मास्कमध्ये

coronavirus impact  for Traditional event kolhapur
coronavirus impact for Traditional event kolhapur

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर)  : ‘बंधू येईल गं माहेरी न्यायला, गौरी- गणपतीच्या सणाला’ अशा श्रावणात कानावर पडणाऱ्या गौरी गीतांच्या सुरावटी यंदा कोरोनाच्या मास्कमध्ये अडकल्या आहेत. त्याच्या प्रभावामुळे गावागावांत खेळल्या जाणाऱ्या या गीतांचा गोडवा यंदा थांबला. कोरोनाचे संकट या सासुरवाशिणींना जड वाटत आहे.


श्रावणात ’नागपंचमी’ सण झाला की लगेच दुसऱ्या दिवशीपासून गावात मध्यवर्ती मांडावर किंवा एखाद्या मोठ्या घरात गौरी गणपतीच्या गीतांच्या सुरावटी निघतात. एकेक करून सासुरवाशिण या मांडावर गीता आळवण्यासाठी फेर धरून हातात घेतात. या गाण्यातून सासरचं आणि माहेरचं नातं कसं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न होतो. गेल्या कित्येक पिढ्यांपासून ही परंपरा आजही कायम आहे. यातून एक अनाहुत माहेरची ओढ सासरवाशीनिच्या मुखातून लोकगीतातून बाहेर पडते. मन मोकळे करण्याचे एक उत्तम साधन म्हणून या गौरी गीतांकडे पहिले जाते. 


शिवाय पावसाळ्यात चांगला पारंपारिक व्यायाम म्हणूनही या झिम्मा फुगडी खेळाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जाते.
साधारणतः नागपंचमीपासून गणेश विसर्जनापर्यंत त्याचा महिमा रंगतो. मात्र यंदा कोरोनाचे संकट या सासुरवाशिणींना आले आहे. कोरोनाचा मास्क तोंडावरच बांधला गेल्याने ही गौरी गीत यंदा मनातल्या मनातच अडकून पडली आहेत. एकत्र येण्याला बंदी, संसर्ग वाढू नये यासाठी केलेले नियम याचा परिणाम या परंपरेवरसुद्धा पडल्याचे दिसते. सासरमध्ये सुखाचा संसार करणाऱ्या महिला गावाकडच्या म्हणजे माहेरच्या नात्याचा ऋणानुबंध अशावेळी व्यक्त करतात. मात्र यावर कोरोणा नावाचे विरजण पडले आहे.

जुन्या पिढीचा आनंदोत्सव
यंदा सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. तसेच, गौराईवरही असल्याने महिला वर्ग विशेषतः वृद्ध महिलांत नाराजी दिसते. नवी पिढी इंटरनेटमध्ये अडकलेली. पण, जुन्या पिढीचा गौरी गीते हा एकमेव आनंदोत्सव असतो.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com