महापालिका अपघात व्हायचीच वाट पाहतेय काय ? 

Is the corporation waiting for an accident?
Is the corporation waiting for an accident?

कोल्हापूर : बुद्ध गार्डन जवळील जीवघेण्या वळणावर महापालिका अपघात होण्याची वाट पाहत आहे काय ? असाच सवाल येथून जाताना उपस्थित होतो. शास्त्रीनगराकडे जाण्यासाठी जवाहरनगर-शाहू सेना चौकातून पुढे हा रस्ता गेला आहे. ओढ्यावरील वळणावर हे जीवघेणे वळण आहे. याच बाजूला सुपर मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पीटल आहे. तेथे येणारे रुग्ण, नातेवाईक याच धोकादायक मार्गावरून पुढे जात आहेत. रात्री येथे ओपन बार असतो. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही हे वळण जीवघेणे बनले आहे. महापालिकेने तातडीने येथे संरक्षण कठडा उभारणे आवश्‍यक आहे. 

जवाहनगरातून शास्त्रीनगराकडे, तसेच ऍस्टर आधार हॉस्पीटल जवळून शास्त्रीनगराकडे जाण्याऱ्या रस्त्यावर हे धोकादायक वळण आहे. बुद्ध गार्डन येथे केएमटीचे आगार आहे. त्याच कोपऱ्यावर हॉस्पीटल आणि जवाहरनगरकडून येणारी वाहने या धोकादायक वळणावरूनच पुढे वाट काढतात. काही वेळा शास्त्रीनगरातून हॉस्पीटलकडे वाहन येत असल्यास अनेकांना भीतीने मागे थांबावे लागते. ये-जा करणारी दोन्ही वाहने येथून जाणे धोक्‍याची घंटा रोज वाजवित आहे. 

याच परिसरातील पार्किंगजवळ छोट्या पुलावर यापूर्वीच संरक्षण खांब उभारले आहेत. मात्र, मुख्य रस्त्यावर नाल्यावर संरक्षण कठडा तातडीने उभारणे आवश्‍यक आहे. जवाहनगरसह इतर अनेक व्यक्ती राजारामपुरीत जाण्यासाठी याच शॉर्टकट रस्त्याचा वापर करतात. त्यांच्यासाठी हे वळण अपघाताच ठिकाण ठरू शकते. तरीही महापालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. 

धोकादायक वळण असूनही याकडे महापालिका गांभिर्याने पाहत नाही. रात्री येथे ओपन बार असतो. वीजपुरवठा असतोच असे नाही. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही हे वळण धोकादायक बनले आहे. महापालिकेने या वळणावर संरक्षण कठणे न उभारल्यास, पदपथ दिवे अधिक न लावल्यास स्थानिकांकडून रस्ता बंद करून आंदोलन करावे लागणार आहे. 
- उदय चव्हाण, जवाहरनगर 

दृष्टिक्षेप 
- शास्त्रीनगराकडे जाण्यासाठीचा जवाहरनगर-शाहू सेना चौकातून रस्ता 
- रुग्ण, नातेवाईकांचा धोकादायक मार्गावरून प्रवास 
- संरक्षक कठडा उभारण्याची गरज 
- राजारामपुरीत जाण्यासाठी हा रस्ता शॉर्टकट 


संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com