घरफाळा घोटाळा चौकशीप्रकरणी नगरसेवक भूपाल शेटे यांचे उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

घरफाळा घोटाळ्यासंदर्भात उपायुक्त निखिल मोरे यांनी संजय भोसले यांना या प्रकरणाच्या संदर्भात 3 कारणे दाखवा नोटीस पाठविल्या आहेत

कोल्हापूर - घरफाळा घोटाळ्यात चौकशी अहवालाप्रमाणे करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले हे देखील 2 कोटींच्या रक्कमेस जबाबदार असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ नगरसेवक भूपाल शेटे यांनी आज उपोषण केले. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी यामध्ये मध्यस्थी केल्याने आणि प्रशासनाच्यावतीने उपायुक्त निखिल मोरे यांनी चार दिवसात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शेटे यांनी आज हे उपोषण स्थगित केले. 

घरफाळा घोटाळ्यासंदर्भात उपायुक्त निखिल मोरे यांनी संजय भोसले यांना या प्रकरणाच्या संदर्भात 3 कारणे दाखवा नोटीस पाठविल्या आहेत. गेला 1 महिना झाले त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. याचा अर्थ त्यांनी हे घर फाळयाचे नुकसान केलेचे मान्य केले आहे. ही सत्य परीस्थिती असताना निखिल मोरे उपआयुक्त हे संजय भोसले यांच्या दबावाला बळी पडून त्यांचेवर निलंबनाची कारवाई करत नाहीत. शहरातील 4 मोठया घरफाळा प्रकरणात संजय भोसले यांनी मिळकतदारांना मोठया प्रमाणात घरफाळा सुट देवून 11 कोटींचे घरफाळयाचे आर्थिक नुकसान केल्याचे प्रशासनानेच मला माहिती अधिकारात माहिती दिलेली आहे. 

हे पण वाचालॉकडाऊनमध्ये दोघांनी चोरल्या तब्बल 15 दुचाकी

संजय भोसले यांची बेकायदेशीरपणे जंपिंग प्रमोशनाने अधिक्षकपदी झालेली निवड उच्च न्यायालय, मुंबई व औदयोगिक न्यायालय, कोल्हापूर यांनी रद्द केली याबाबत प्रशासनाने त्यांचे बेकायदेशीर पगारावर झालेला खर्च रू. 67,00,000/-अजूनही वसुल केलेला नाही. तसेच त्यांच्यावर याबाबतही निलंबनाची व फौजदारी कारवाई केली नाही. तसेच संजय भोसले यांनी दि. 2/8/2012 ते 20/8/2020 पर्यंत अतिरीक्त परीवहन व्यवस्थापक नसताना गाडीचा बेकायदेशीर वापर केलेला आहे. गाडीचा वापर व ड्रायव्हर पगार यावर महापालिकेचे रू. 55,00,000/- नुकसान झाले असून याबाबतही संजय भोसले यांचेवर निलंबनाची व फौजदारी कारवाई झालेली नाही. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator Bhupal Shete fast on home tax scam probe