नियमित आहारात अंडी खाताय मग ही बातमी वाचाच....

अमोल सावंत | Wednesday, 16 September 2020

कोरोनाकाळात मागणी वाढली; विक्रेत्यांना फायदा, उत्पादकांच्या पदरात नेहमीचाच दर

कोल्हापूर : लॉकडाउननंतर अंड्यांच्या दरात वाढ होत गेली. हॉटेल, हातगाड्या, रेस्टॉरंटस्‌ बंद असली तरी कोविड सेंटर, रुग्णालये, घरांत अंड्यांना मागणी वाढली आहे. परिणामी, अंड्यांचे दर सात रुपयांपर्यंत गेले. याचा फायदा अंडी विक्रेत्यांना झाला; पण पोल्ट्री व्यावसायिकांना याचा काडीचाही लाभ झाला नाही.

कोरोनानंतर लॉकडाउन झाले. वाहतूक बंद झाली. गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटकातून कोंबडीच्या खाद्याचा पुरवठा झाला नाही. खाद्याअभावी पक्षाची मर झाली. हजारो कोंबड्या, अंडी नष्ट करावी लागली. मक्‍क्‍याचे उत्पादन घटले. मक्‍क्‍यांवर अमेरिकन आळीचा प्रादुर्भाव झाला. मक्‍क्‍याचा दर सध्या २८ ते ३७ रुपये किलो आहे. हाच दर लॉकडाउनच्या आधी १३ ते १४ रुपये किलो होता. मार्चमध्ये कोरोनामुळे चिकनचा दर १०० रुपये किलो तर एक अंड्यांचा दर तीन ते साडेतीन रुपये होता. आता एका अंड्यांचा दर हा सात रुपये आहे. 

हेही वाचा- सात क्रमांक ठरला  ‘आर्मी सप्लायर’ घाटगे यांचा लकी नंबर -

अंड्यातील घटक (टक्‍क्‍यांत) 
पांढरा बलक (५८), पिवळा बलक (३१), कवच (११). पाणी (७३.७), प्रथिने (१२.९), स्निग्धांश (११.५), क्षार (१), कार्बोहायड्रेडस्‌ (०.९). पिवळ्या बलकातील घटकातील स्निग्ध पदार्थ (३२.५, प्रथिने (१७.५). एका अंड्यापासून ९० कॅलरी, १०० ग्रॅम अंड्यापासून १६३ कॅलरी. 

अंड्याचे आर्थिक गणित
 अंड्यांच्या सेंटरमधून पाच रुपये ७३ पैशांप्रमाणे        ३० अंड्यांचा क्रेट 
 ३० अंड्यांच्या क्रेटचा दर १७१.९० रुपये
 तडा गेलेल्या ३० अंड्यांचा क्रेट ९० रुपये. 
 तडा गेलेले एक अंडे एक किंवा दोन रुपये

हेही वाचा-चला, ओझोनचे संरक्षण करूया ; निसर्गमित्र संस्थेतर्फे विविध कृती कार्यक्रम -

अंडे का फंडा 
 पहिले अंडे मिळण्यावेळी कोंबडीचे वय १३३ ते         १४० दिवस 
 ५० टक्के अंडी मिळण्यावेळी कोंबडीचे वय १५४         ते १६५ दिवस 
 जास्त अंडी उत्पादनावेळी कोंबडीचे वय १८० ते         २०० दिवस

दृष्टीक्षेपात
 जिल्ह्याची लोकसंख्या -३८७६००१,         ग्रामीण -२६४५९९२, शहरी -१२३०००९
 दररोज १० लाख अंडी बाजारात; कोल्हापूर         व अन्य जिल्ह्यांतून
 लॉकडाऊनच्या आधी सात लाख पक्षी,         सध्या तीन ते साडेतीन लाख पक्षी

बदलणारे दर
 नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटीचे अंड्यांचा              दरावर नियंत्रण
 अंड्याचे दर दररोज बदलत असतात

‘‘शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना सहा रुपये हातात मिळाले पाहिजे. गेले दीड वर्ष २.९० पैशांना आम्ही अंडी विक्री केली. आता घाऊक विक्रीत सात रुपयांना एक अंडे विकले जाते. मग मधली तफावत कशी भरुन काढायची? यासाठी पोल्ट्रीकडे शासनाने लक्ष द्यावे.’’ 
-शत्रुघ्न जाधव, अध्यक्ष, सांगली-कोल्हापूर जिल्हा पोल्ट्री असोसिएशन

 

संपादन -  अर्चना बनगे