पोलिस पांडुरंग विटेवर नाही वाटेवर उभा ! : बहिणींनीकडून पोलिसांच्या कामाला सलाम

स्वप्निल पवार
Monday, 28 September 2020

महाराष्ट्र पोलिस सलाम तुमच्या कर्तुत्वाला,कुटुंब सोडून कशाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी लढणारे तुम्ही तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा,

 

देवराष्ट्रे (सांगली) : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना आपला जीव धोक्यात घालून नागरिक सुरक्षित रहावे यासाठी पोलिस प्रशासन कोरोना मिशन प्रभावीपणे राबवत आहे. राज्यातील पोलिसांना कोरोना झाला त्यात अनेक पोलिस बांधवांचा मृत्युही झाला. ऊन,वारा,पावसात कोरोना विषाणूच्या विचार न करता पोलिसांचे काम अखंडितपणे आज अखेर सुरू आहे. या कामगिरीची अनेक पातळीवर दखल घेतली जात असताना दोन  बहीनीसुद्धा एका पेंटिंगच्या माध्यमातून पोलिसांच्या कामाला सलाम केला आहे.

हेही वाचा-‘माझे कुटुंब’ मोहिमेपासून गावातील नेते चार हात लांबच -

 सोनकिरे ता.कडेगाव. येथील निलम पाटील व सुमित्रा पाटील या दोन बहिणींनी हे चित्र साकारले आहे.या चित्रात पांडुरंगाची मूर्ती साकारली आहे त्यामध्ये पोलीस बांधव उभा आहे असे दर्शवले आहे तो “पांडुरंग आहे आपल्यासाठी विटेवर नाही तर वाटेवर उभा” महाराष्ट्र पोलिस सलाम तुमच्या कर्तुत्वाला,कुटुंब सोडून कशाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी लढणारे तुम्ही तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा, असा पोलिसांना ऊर्जा देणारा संदेश,पोलिस कोरोनाच्या महामारीतील काम व आपल्यासाठी पोलिस व्यवस्था किती महत्वाची भूमिका बजावतात हे या चित्रात साकारले आहे.हे चित्र चिंचणी वांगी पोलिस ठाणे येथील सहाय्यक पोलिसनिरीक्षक संतोष गोसावी यांच्याकडे सुपूर्त केले आहे. हे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

हेही वाचा- Kolhapur CPR Fire Update :  आगीत चार जणांचा मृत्यू -

"हे चित्र पाहून आम्ही भारावून गेलो आहोत ,या चित्रात पोलिस प्रशासन कोरोना मध्ये करीत असलेले काम व पोलिसांना पांडुरंगाची दिलेली भूमिका या चित्रातून आम्हाला काम करण्यास उर्जा मिळाली आहे."

संतोष गोसावी

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid positive story by swapnil pawar two sisters expressed their gratitude through the picture