सीपीआर'च्या आगीचा अहवाल दडपला

 CPR's fire report was suppressed
CPR's fire report was suppressed

कोल्हापूर ः सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आग लागली. या घटनेची चौकशी झाली. सुरवातीला चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, प्रत्यक्ष सहा मृत्यू झाले. एकाही मृतदेहाचे विच्छेदन झाले नाही. आग लागलेल्या वॉर्डात उपचार घेणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला तरीही कोरोनाचा मृत्यू असल्याचे सांगत नुकसान भरपाईचा प्रश्‍नच "सीपीआर'ने मिटविला आहे. घटनेचा चौकशी अहवाल शासनाला दिला, एवढे सांगितले जात असल्याने हा अहवालच दडपल्याचा संशय आहे. 
सीपीआर पूर्ण वेळ कोरोना रुग्णालय असल्याने येथे गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. या वेळी ट्रामा केअर युनिटमध्ये पहाटे आग लागली. त्या वेळी या विभागात 16 रुग्ण उपचार घेत होते. ते सर्व जण व्हेंटिलेटरवर होते. अशा अवस्थेत सुरक्षारक्षक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून येथील रुग्णांना अन्य वॉर्डमध्ये हलविले. या काळात कोरोनाबाधित रुग्ण गुदमरल्याची शक्‍यता वर्तविली. 
"सीपीआर'चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांनी सुरवातीला तीन मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी एकच मृत्यू झाल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत सहा जणांचे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. पोलिसांत दोन मृत्यूंची नोंद उशिरा झाली. 
एकाही मृतदेहाचे विच्छेदन केले नाही. प्रत्यक्ष आग लागल्यावर रुग्णांचे व्हेंटिलेटर काढून अन्य विभागांत न्यावे लागले, तेव्हा वॉर्डात धूर झाला. या धुरात अनेक जण गुदमरल्याची शक्‍यता आहे. आगीनंतर अवघ्या तीन तासांत तिघांचे मृत्यू झाले. 

येथे येतो संशय 
कोरोनामृतांचे विच्छेदन न करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत, मात्र अपघाताच्या ठिकाणी मृत्यू झाला, त्याचे शवविच्छेदन करावे की न करावे, याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन का घेतले नाही, याचे संदर्भ चौकशीत आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

""आगीच्या घटनेचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. मृत व्यक्ती कोरोनाबाधित असल्याने त्यांचे विच्छेदन झालेले नाही. कोरोना मृत्यू झाल्याने नुकसान भरपाई मिळत नाही. तरीही पुन्हा एकदा अहवालाची माहिती घेतली जाईल.'' 
- डॉ. एस. एस. मोरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

संपादन - य़शवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com