म्हणून त्याला झाली जन्मठेप व 5 हजार रूपये दंड....

crime case in ichlkarnji kolhapur
crime case in ichlkarnji kolhapur

इचलकरंजी : पत्नीच्या डोक्यात गाडीचे जॅक घालून ठार मारणार्‍या रूई (ता. हातकणंगले) येथील युवकास आज येथील न्यायालयाने जन्मठेप व 5 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. सद्दामहुसेन बाळू मकुभाई (वय 26, रा. मानेनगर, रूई) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.बी. शेळके यांनी सुनावली.


रूई येथील मानेनगर भागात मकुभाई परिवार राहत होता. सद्दामहुसेन हा टेम्पो चालविणे व हमालीचे काम करीत होता. कामातून आलेले पैसे तो घरी देत नसत. त्यामुळे त्याचे वारंवार घरातील व्यक्तींशी भांडण होत असत. पत्नी परवीन व आई वडिलांच्याबरोबर वारंवार भांडणे होत होती. त्यातून तो मारहाणही करीत असत. 20 जानेवारी 2017 रोजी रात्री सद्दामहुसेन पत्नी परवीन व त्यांची मुले जेवण झाल्यानंतर मानेनगर येथील घरी होते. त्यावेळी सद्दाम याने गाडीचे जॅक पत्नी परवीन हिच्या डोक्यात घालून रक्तबंबाळ केले. त्यानंतर येथील आयजीएम रूग्णालयात घेऊन आले.

मात्र उपचारापूर्वीच परवीन यांचे निधन झाले होते. याबाबतची फिर्याद सद्दामहुसेन यांचे वडील बाळू गुलाब मकुभाई (रा. मानेनगर, रूई) यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात दिली आहे. तत्कालिन उपनिरिक्षक आर. के. रानगर यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-2 यांच्या न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. सरकारी वकिल म्हणून व्ही. जे. सरदेसाई यांनी काम पाहिले.

आरोपीचे वडिल बाळू, आई गौसबी, बहिण इम्तियाज सनदी, रवी कांबळे, राजू निगवे, अमीर मुजावर, रसिक पठाण, सलीम सय्यद, जावेद मकुभाई, नारायण सातपूते, वैद्यकीय अधिकारी डॉ. महाडिक, सहाय्यक फौजदार एम. बी. कोळी, पोलिस उपनिरिक्षक श्री. रानगर अशा एकूण 13 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकारी वकिलांतर्फे झालेला युक्तीवाद व साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य मानून जिल्हा न्यायाधीश एच. बी. शेळके यांनी आज वरील शिक्षा सुनावली. सरकारी वकिलांना मदत म्हणून हातकणंगले पोलिस कॉन्स्टेबल संग्राम पाटील यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com