धक्कादायक! पंधरा दिवसापूर्वीच घरी परतलेल्या शुभमचा निर्घृण खून ; हातकणंगलेतील प्रकार

crime cases in kolhapur ichalkaranji one young person dead in this case
crime cases in kolhapur ichalkaranji one young person dead in this case

हातकणंगले (कोल्हापूर) : इचलकरंजी-हातकणंगले मार्गावरील कोरोची माळावर अज्ञात मारेकऱ्यांनी एका तरुणाचा दगडाने चेहरा ठेचून निर्घृण खून केला. हा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. शुभम उमेश कमलाकर (वय २१, रा. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. 

अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह हातकणंगले पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी रक्ताळलेला सिमेंटचा पोल, दोरी मिळून आली आहे. दरम्यान, याप्रकरणी काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली असली, तरी पोलिसांनी मात्र याला पुष्टी दिलेली नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मृत शुभमचे वडील रिक्षाचालक आहेत. शुभम काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता होता. तो पंधरा दिवसापूर्वी घरी परतला होता. शुभमचा काही मित्रांचा गट होता. युवक कोरोची ओढा परिसरात रोज जात असल्याची माहिती पुढे आली आहे. घटनास्थळी नशेचे काही पदार्थ मिळाले आहेत. शुभमचे कपडे पूर्णतः फाटले होते. त्यामुळे झटापट झाल्याचीही शक्‍यता आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कातील काही युवक नॉट रिचेबल आहेत. पोलिसांनी माहितीसाठी त्यांच्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. सुमारे बारा वर्षापूर्वी याच ठिकाणी अनैतिक संबंधातून एकाचा त्याची पत्नी, तिचा प्रियकर व मुलाने खून केल्याची धक्कादायक प्रकार घडला होता. या खुनाने त्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. 

"काही संशयित युवकांची नावे समोर आली आहेत. माहिती घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व काही स्पष्ट होईल."

- जयश्री गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com