Cycling Activity In Uttur Kolhapur Marathi News
Cycling Activity In Uttur Kolhapur Marathi News

पाचाचे झाले पंधरा युवक... उत्तूरला आकारास येतोय अनोखा उपक्रम

उत्तूर : कोरोनासारख्या विषाणूशी दोन हात करायचे झाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. यासाठी उत्तूर (ता. आजरा) येथील युवकांनी "सायकल चालवा रोग प्रतिकारकशक्ती वाढवा' हा उपक्रम सुरू केला आहे. रोज सकाळी 6 ते 8 यावेळेत सुमारे पंचवीस कि. मी. सायकल युवक चालवतात. 3 जूनला सायकल दिनानिमित्त या अनोख्या उपक्रमाची सुरवात झाली आहे. सुरवातीला पाच ते सहा जण यामध्ये सहभागी झाले होते. आता ती संख्या पंधरावर पोहोचली आहे. 

सायकल चालवणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल अनेक जण जनजागृती करतात, परंतु प्रत्यक्षात अगदी मोजकेचं नागरिक सायकलीचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात करताना आढळतात. पूर्वी दुचाकीऐवजी सायकलचा वापर नागरिक करीत होते. दैनंदिन कामांसोबत त्यांचा उत्तम व्यायामही होत असे, मात्र आता धावत्या युगात सायकली अडगळीत पडल्या आणि व्यायामही थांबला.

कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एखदा व्यायामाचे महत्त्व पटायला लागले आहे. वाहनांच्या माध्यमातून होणारे वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषणही अधिक आहे. त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी एक मोठी समस्या आहे. ती रोखण्यासाठी आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी सायकलचा चांगला पर्याय म्हणून उपयोग होऊ शकतो. त्यामुळे सायकल चालवणे हे गावातील नागरिकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न या युवकांतर्फे करण्यात येत आहे. 

संघटना करणार 
सायकलचे गाव उत्तूर या उपक्रमाची घोषणा यानिमित्ताने आम्ही केली आहे. यासाठी गावात सायकल क्‍लब, सायकलप्रेमींची संघटना करण्यात येणार आहे. गावातून प्रत्येक तरुण शहरात फिरताना दुचाकीऐवजी सायकलला पहिले प्राधान्य देईल, अशी स्थिती निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे गाव प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल. 
- पराग देशमाने, युवक 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com