Dalit settlement proposals to be scrutinized: Additional Chief Executive Officer
Dalit settlement proposals to be scrutinized: Additional Chief Executive Officer

दलित वस्ती प्रस्तावांची छाननी होणार : अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी

कोल्हापूर  : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे दलित वस्ती सुधार अंतर्गत आलेल्या 36 कोटींच्या निधीचे प्रस्ताव छाननी करुनच मंजूर केले जातील, अशी माहिती अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी दिली. सध्या जिल्हा परिषदेत दलित वस्ती निधी वाटपाचा विषय चर्चेत आहे. समाजकल्याण समितीतच फूट पडली आहे. सभापती विरुध्द सदस्य असे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. माने यांनी घेतलेल्या भूमिकेने पदाधिकारी, सदस्यही बुचकळ्यात पडले आहेत. 
दलित वस्तीचे निधी वाटपाबाबत समितीच्या सभेतच सदस्यांकडून जी नावे दिली जातात, त्याच यादीला मंजुरी दिली जाते. मात्र हा प्रकार पूर्णपणे चुकीचा व शासन निर्णयाच्या विरोधात आहे. ज्या गावातील दलित वस्तीला निधी द्यायचा आहे, त्यांच्याकडून अर्ज घेणे, ग्रामपंचायतीचा ठराव, पंचायत समितीतून गट विकास अधिकाऱ्यांनी खात्री करुन मग हे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीला सादर करणे आवश्‍यक आहे. आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन यातील योग्य प्रस्तावास समितीने मंजुरी देणे आवश्‍यक आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया गेली काही वर्षे डावलण्यात येत आहे. 
गतवर्षीही श्री. माने यांच्याकडे घाईगडबडीने प्रस्ताव पाठवण्यात आले होते. मात्र यावेळी सर्व प्रस्ताव तपासूनच मंजुरी देणार असल्याची भूमिका श्री. माने यांनी घेतली आहे. त्यामुळे पदाधिकारी, सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी खर्च करण्यास दोन वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे घाईगडबडीत, प्रस्ताव नसताना एकाही गावाला निधी देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने सदस्यांची पंचाईत झाली आहे. 


..तर राज्य शासनाची मंजुरी 
निधी वाढवून दिला नाहीतर दलित वस्तीच्या यादीवर सही न करण्याची भूमिका समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांनी घेतली आहे. मात्र याला समितीच्या सदस्यांनी व नेत्यांनीही विरोध केला आहे. जर सासणे यांनी सही केली नाहीतर कोणाच्या सहीने ही यादी मंजूर करायची, याबाबत राज्य शासनाकडे मार्गदर्शनही मागवण्यात आले आहे. त्यामुळे सभापतींना निधी वाटपामध्ये नमती भूमिका घ्यावी लागणार असल्याचे सदस्यांकडून सांगण्यात येत आहे.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com