टस्कराने फडात फेकली बैलगाडी ; पिकात घातला धुडगूस 

Damage to agriculture from tuskers
Damage to agriculture from tuskers

आजरा - आजरा तालुक्‍यात वावरणाऱ्या दोन टस्करांपैकी एक जण किटवडे परिसरात गेला आहे, तर दुसरा टस्कर भुदरगड तालुक्‍यातील पिंपळगाव परिसरात आहे. किटवडे परिसरात गेलेल्या टस्कराने किटवडे धनगरवाड्यावर धुडगूस घातला. पिकांच्या नुकसानीसह कानू शेळके यांची बैलगाडी उसाच्या फडात फेकून दिली. 

हाळोली, मसोली परिसरात वावरणारे दोन टस्करांपैकी एक कागल तालुक्‍यात तळ ठोकून आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी तात्पुरता सुटकेचा निःश्‍वास घेतला आहे. किटवडे परिसरात गेलेला टस्कर काल (ता. 21) रात्री किटवडे धनगरवाड्यावर पोहोचला. त्याने कोकरे यांची बैलगाडी फेकून दिली. कानू बाबू शेळके, भिकाजी गंगू कोकरे, बागू गंगू कोकरे, बमुबाई बाबू शेळके, विजय अर्जुन शेडगे, नारायण गंगाराम शेळके यांच्या भात, नागली व ऊस पिकाचे नुकसान केले. धनगरमोळा विभागाचे वनपाल सुरेश गुरव यांनी पंचनामा केला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com