आजऱ्यात वणव्यांमुळे वनसंपदेची हानी

Damage To Forest Resources In Ajara Kolhapur Marathi News
Damage To Forest Resources In Ajara Kolhapur Marathi News

आजरा : आजरा तालुक्‍याचा जंगल भाग दाट असून नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न आहे. या जंगलांना सध्या वणवे लागण्याचे सत्र सुरू झाले आहे. सिरसंगी जंगलानंतर वझरे पठारला आग लागल्याने वणव्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. वणव्यांमुळे वनसंपदेची मोठी हानी होत असून यावर वन विभागाने ठोस उपाययोजना अवलंबण्याची गरज व्यक्त होत आहे. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रबोधनाची आवश्‍यकता आहे. 

जागतिक तापमान वाढीमुळे आदीच पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. मानवाच्या दैनंदिन सवयी, असमतोल विकास, लोकसंख्या वाढ यांमुळे निसर्गातील वनसंपदेवर ताण पडत आहे. सध्या तालुक्‍यातील जंगलांमध्ये पाणगळ सुरू आहे. वाळलेले गवत व पालापाचोळा यांमुळे जंगलांत वणवे भडकत आहेत. तालुक्‍यात सिरसंगी व वझरे पठार जळाले आहे.

हे वणवे मानवनिर्मित असल्याची चर्चा परिसरात आहे. याचा परिसंस्थेवर विपरीत परिणाम होत असून खालच्या स्थानी असलेले तृणभक्षी प्राणी चितळ, सांबर, भेकर, रानगवा, वनगाय, जमिनीवर अधिवास करणारे पक्षी रानकोंबड्या, तितर, लाव्हे, मोर, टिटवी, धाविक तसेच सरीसृप वर्गातील साप, सरडे, पाल, घोरपड यांसारख्या पक्षी, प्राण्यांची वीण (घरटे) उद्‌ध्वस्त होत आहे. 

पश्‍चिम घाट युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट आहे. जगात कुठेही न सापडणाऱ्या काही स्थानिक प्रजाती फक्त पश्‍चिम घाटातच आढळतात. ब्लॅक पॅन्थर, मलबार ग्लायडींग फ्रॉग (हिरवे बेडूक) यांसह अन्य दुर्मिळ प्रजातींचे अस्तित्व आहे. वणव्यांमुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. यांतील अनेक प्रजाती संकटग्रस्त आहेत.

यासाठी वन विभाग, पर्यावरणप्रेमी, पर्यावरण संस्था यांच्यामार्फत जनसामान्यांमध्ये प्रबोधन व पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी ठोस उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत. नागरिकांनीदेखील आपला सहभाग नोंदवून सह्याद्रीचा हा अमूल्य ठेवा जतन केला पाहिजे, असे जाणकार सांगतात. 

परिसंस्थेवर आघात 
वणव्यांमुळे परिसंस्थेवर आघात होतो. एखादी परिसंस्था उदयास यावयाला अनेक वर्षांचा कालावधी लागतो; पण वणव्यांमुळे या परिसंस्था नष्ट होतात. त्यांतील अनेक पक्षी, प्राणी व वनस्पतींच्या दुर्मिळ व संकटग्रस्त प्रजाती लुप्त होण्याचा धोका संभवतो. 

एक दृष्टिक्षेप 
- गुरे चराईसाठी गवत चांगले येत असल्याच्या गैरसमजापोटी वणवे लावण्याचे प्रकार. 
- शिकार मिळवण्यासाठीही आग लावली जाते. 
- क्वचित प्रसंगी नैसर्गिकरित्या जंगलांना वणवा लागतो. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com