जिल्हा परिषदेची ग्रामपंचायत प्रशासक निवडताना दमछाक

 Damchak while electing Gram Panchayat Administrator of Zilla Parishad
Damchak while electing Gram Panchayat Administrator of Zilla Parishad

कोल्हापूर : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेकडून प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र हे करत असताना मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. 4 ऑगस्ट अखेर संपणाऱ्या 31 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले. यामध्ये एकेका प्रशासकाकडे चार-चार ग्रामपंचायतींचा कारभार आला आहे. 
अनेक तांत्रिक अधिकाऱ्यांवर जसे शाखा अभियंता, सहायक अभियंता तसेच पर्यवेक्षकांकडेही हा कारभार देण्यात आला आहे. कोरोनाचे संकट असतानाच आता महापुराचेही मोठे संकट येऊ घातले आहे, अशा काळात पुन्हा प्रशासक पदाचा डोलारा सांभाळताना संबंधित कर्मचाऱ्यांना मात्र मोठी कसरत करावी लागणार आहे. 
कोरोनामुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांची मुदत संपली आहे, तिथे आहे त्या संचालक मंडळालाच मुदतवाढ दिली आहे. तर ग्रामपंचायतींच्या बाबतीत राज्य शासनाने खासगी व्यक्‍तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याची शिफारस केली आहे. पालकमंत्र्यांच्या संमतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासक नेमावा, असे सुचवण्यात आले आहे. मात्र प्रशासक निवडीत राजकारणाचा शिरकाव होण्याची शक्‍यता असल्याचे सांगत अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत राज्य शासन व याचिकाकर्ते आपापली भूमिका मांडत आहेत. दरम्यानच्या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे काम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. 
कोल्हापूर जिल्ह्यातील 31 ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची नियुक्‍ती करण्यात आली. एकेका कर्मचाऱ्यावर चार, चार ग्रामपंचायतींची प्रशासक म्हणून जबाबदारी दिली आहे. ग्रामपंचायत विभागाचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वा विस्तार अधिकारी यांना ग्रामपंचायत कायद्याची माहिती आहे. मात्र शाखा अभियंता असेल किंवा कनिष्ठ अभियंता हे तांत्रिक अधिकारी आहेत. त्यांना आता प्रशासक म्हणून कारभार करताना ग्रामपंचायत अधिनियमांचा अभ्यास करावा लागणार आहे. काही पर्यवेक्षिका, सांख्यिकी अधिकारी यांचीही अशीच परिस्थिती आहे. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोरोना तसेच महापुराच्या कामाची जबाबदारी आहे. आता यात ग्रामपंचायत प्रशासक पदाचीही भर पडली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना मात्र मोठी कसरत करावी लागणार, हे मात्र निश्‍चित. 

मुदत संपलेल्या ग्रामपंचायती तारखेनुसार 
21 मे-4,14 जुलै-1, 31 जुलै-12, 2 ऑगस्ट-22,3 ऑगस्ट-11,4 ऑगस्ट-31, 6 ऑगस्ट-20,7 ऑगस्ट-204, 9 ऑगस्ट-3, 10 ऑगस्ट-25, 11 ऑगस्ट-2, 12 ऑगस्ट-6, 13 ऑगस्ट-1, 19 ऑगस्ट-1, 21 ऑगस्ट-1,, 25 ऑगस्ट-1,28 ऑगस्ट- 6, 30 ऑगस्ट -21, 31 ऑगस्ट-21 एकूण-393 

संपादन -यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com