"कौशल्य विकास'ची मागणी वाढणार 

Demand for "skill development" will increase
Demand for "skill development" will increase

कोल्हापूर: "लॉक डाऊन'मुळे विद्यापीठे बंद झाली, परीक्षा पुढे गेल्या. देशातील 37 दशलक्ष विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. मात्र, याच काळात तरुणाईने ऑनलाईन अभ्यासक्रम आत्मसात करण्यावर भार दिल्याचे समोर आले आहे. विविध कोर्स असणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वयंपोर्टलला एका दिवसांत 19 हजार हिट्‌स मिळाल्या. शिवाय कोर्सेरा, एनपीटीईएल यांच्याकडील विविध कोर्सेसनाही प्रतिसाद वाढत आहे. 

अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयांनीही ऑनलाईन अध्यापनाचा प्रारंभ केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेही (युजीसी) ऑनलाईन अभ्यासक्रम बनवणे आणि अध्यापनाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आगामी काळात ऑनलाईन कोर्सेस अधिक वाढतील, असे चित्र आहे. 

"लॉकडाऊन'मध्ये विद्यार्थी, नोकरदार आणि विविध प्रकारचे व्यावसायिक यांनी ऑनलाईन कोर्स करण्याला प्राधान्य दिल्याची बाब समोर आलीय. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपिंग, ऍप आणि वेब डिझायनिंग, स्टार्टअप, व्यवसाय वाढीसाठी उपयोगी पडणारे कोर्सेस करण्याकडे कल असल्याचे दिसते. आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित ऍप बनवायला शिकण्याकडेही कल दिसून येत आहे. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांनी विविध ऍपचा वापर करून ऑनलाईन अध्यापन सुरू केले. "स्वयं' पोर्टलला एकाच दिवशी 19 हजार हिट्‌स मिळाल्या असून यावर 1900 कोर्सेस उपलब्ध आहेत. परदेशातूनही विद्यार्थी ऑनलाईन कोर्स करतात. "कोर्सेरा फॉर कॅम्पस' पोर्टलवरही विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेशन कोर्सेस केले आहेत. एनएसबीसीच्या मान्यताप्राप्त कोर्सेसनाही अधिक मागणी असून, त्यातून रोजगाराच्याही संधी उपलब्ध आहेत. "लॉक डाऊन'मधील या गोष्टींचा अभ्यास केल्यास भविष्यकाळात शिक्षणाची दिशा बदलेली दिसेल. कौशल्य विकास अभ्यासक्रमांकडेही कल वाढेल. प्रत्येक जण क्षमतेनुसार कोर्स निवडेल आणि रोजगाराभिमुख होण्याचा प्रयत्न करेल. 
 

विद्यापीठीय अभ्यासक्रम पोर्टलवर 
विद्यापीठ अनुदान आयोगाने "मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस' (मूक) पोर्टल सुरू केले आहे. यावर देशभरातील प्राध्यापक हे त्यांच्या विषयांचे अभ्यासक्रम पाठवतात. पोर्टलवरून अध्यापन कौशल्य आत्मसात करता येते. तसेच विविध विषयांची अद्ययावत माहितीही मिळते. सर्वच विद्यापीठांनी उच्च शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यासाठीच्या स्वरुपात बनवण्यासही सांगण्यात आले आहे. 

जगातील नामांकित विद्यापीठांनी ऑनलाईन अध्यापन पद्धती स्वीकारली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेनुसार, आवश्‍यकतेनुसार आणि कमी खर्चात शिक्षण घेणे शक्‍य होते. रोजगार निर्मितीलाही चालना मिळते. यासाठी विद्यापीठांनी ऑनलाईन अध्यापनाला महत्त्व द्यावे. 
- डॉ. बी. एम. हिर्डेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ 


ऑनलाईन कोर्स करताना त्यांची प्रमाणितता पाहिली पाहिजे. योग्य कालावधीच्या कोर्सची निवड केली पाहिजे, जेणेकरून आपल्या कोर्सचा रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या दृष्टीनेही उपयोग होईल. अनेक अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करणे गरजेचे आहे. 
- डॉ. आर. व्ही. कामत, विभागप्रमुख, संगणकशास्त्र, शिवाजी विद्यापीठ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com