२०२० चा कोल्हापुरचा महापौर भाजपचाच : धनंजय महाडिक

 Dhananjay Mahadik say upcomeing Kolhapur Mayor bjp
Dhananjay Mahadik say upcomeing Kolhapur Mayor bjp

कोल्हापूर - ‘काळम्मावाडीतून थेट पाईपलाईनने पाणी मिळण्याचे शहरवासीयांचे स्वप्न आम्हीच पूर्ण करू,’ अशी ग्वाही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांच्या कार्यालय प्रवेशप्रसंगी पालिकेत आले असता त्यांनी ही मुलाखत दिली. तसेच नोंव्हेंबर २०२० ला महापौर भाजपचाच असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

थेट पाईपलाईनचे स्वप्न आम्हीच पूर्ण करू

ते म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत दोन्ही काँग्रेसच्या नेतेमंडळींना कोल्हापूर शहरवासीयांसाठी थेट पाईपलाईनने पाणी आणण्याचे काम पूर्ण करता आलेले नाही. त्यांना ते होणारही नाही. महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. यात थेट पाईपलाईन हाच आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल. शहरातील सर्व जागांवर आम्ही निवडणूक लढवू. सध्या आमची तशी तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतलेत. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची विकासकामे केली आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनता भाजपलाच मतदान करेल व आगामी महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com