इचलकरंजीला पाणी देऊ नका, शेतकऱ्याला फसवू नका... 

Don't give water to Ichalkaranji, don't deceive the farmer ...
Don't give water to Ichalkaranji, don't deceive the farmer ...

चुये :  दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरास पाणी देण्यास नंदगाव परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. रिकाम्या घागरी व काळे झेंडे दाखवून शासनाच्या निर्णयाचा कृती समितीने निषेध केला. नंदगाव-खेबवडे (ता. करवीर) दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीवरील पुलावर परिसरातील शेतकऱ्यांचा धरणे आंदोलनात सहभाग होता. यामध्ये नंदगाव, खेबवडे, नागाव, इस्पुर्ली, दऱ्याचे वडगाव, कोगील बुद्रुक, येवती, दिंडनेर्ली, हालसवडे, वडवाडी व गिरगाव या गावातील शेतकरी सहभागी झाले होते. 

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ढवण म्हणाले,""या धरणाच्या पुनर्वसनासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे हे आमच्या हक्काचे पाणी आहे. हे पाणी विविध कारणांनी प्रत्येक जण पळवून नेत आहे. त्यामुळे आपल्यावर एक दिवस पाणी पाणी म्हणण्याची वेळ येणार आहे. राजकीय श्रेयवादातून शेतकऱ्याला फसविण्याचे पाप कोणीही करू नये.''पंचायत समितीचे सदस्य रमेश चौगले म्हणाले,""वेगवेगळ्या नावाखाली शासन दूध गंगेचे पाणी नेण्याचा प्रयत्न करीत आहे. तो आम्ही हाणून पाडू. या प्रश्‍नी समरजीतसिंह घाटगे यांनी घेतलेल्या भुमिकेच्या पाठीशी सर्व शेतकरी ठामपणे उभे राहूया.'' 
स्वाभिमानी संघटेचे संपत पाटील म्हणाले,""दूधगंगा वेदगंगा लाभक्षेत्रातील 40 टक्के क्षेत्र अजून कोरडे आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार आहे. परंतु नेतेमंडळी कागदावर चुकीची आकडेवारी दाखवून पाणी पळवून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.'' 

यावेळी सुयोग वाडकर, शाहू साखर कारखान्याचे संचालक मारुती निगवे, संजय पाटील, रंगराव तोरसकर, विलास पाटील, ज्ञानदेव पाटील, सनी नरके, जी. आर. पाटील, भुपाल पाटील, दीपक पाटील, कृष्णात शिंदे यांचेही मनोगत झाले. 

मुळ विषयाला बगल नको... 
विक्रमसिंहराजे बॅंकेचे चेअरमन एम. पी. पाटील यांनी, काल झालेल्या मुरगूड येथील समारंभात तेथील तलावाच्या पाण्याचा मुद्दा मांडण्यात आला. मात्र, हा प्रकार म्हणजे मूळ विषयाला बगल देण्यातील आहे. तसे न होता सध्या शेतकऱ्यांचा ज्या विषयावरून असंतोष आहे. त्या विषयावरून कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीला उपस्थित होते. या विभागाचे सचिव यांनी याबाबत सविस्तर माहिती देऊन सुद्धा ते मात्र आपल्याला याबाबत माहित नाही. माहिती करून घेतो. असे सांगत आहेत. हा शुद्ध कांगावा आहे. असाही टोला लगावला. 

दृष्टिक्षेप 
- कृती समितीचे आंदोलन 
- रिकाम्या घागरी, काळे झेंडे दाखवून शासनाच्या निर्णयाचा निषेध 
- नंदगाव, खेबवडे, नागाव, इस्पुर्लीसह परिसरातील ग्रामस्थ सहभाग 
- चुकीची आकडेवारी दाखवून पाणी पळवून नेण्याचा प्रयत्न

कोल्हापूर 

कोल्हापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com