esakal | तहसीलदार असल्याचे नाटक दोघांना भोवले

बोलून बातमी शोधा

The drama of being a tehsildar went in to jail

तहसीलदार असल्याचा बनाव करून चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास अडवून मारहाण करून लुबाडणाऱ्या नथूराम कांबळे (रा. कोळगांव, ता. शाहूवाडी) व त्याचा साथीदार विष्णू विठ्ठल पारळे (ससेगाव, ता. शाहूवाडी) यांच्यावर पोलिसांत आज गुन्हा दाखल झाला. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान विष्णू पारळे याला आज येथील प्रथम वर्ग न्यायालयाने 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तहसीलदार असल्याचे नाटक दोघांना भोवले
sakal_logo
By
Team eSakal

शाहूवाडी ः तहसीलदार असल्याचा बनाव करून चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास अडवून मारहाण करून लुबाडणाऱ्या नथूराम कांबळे (रा. कोळगांव, ता. शाहूवाडी) व त्याचा साथीदार विष्णू विठ्ठल पारळे (ससेगाव, ता. शाहूवाडी) यांच्यावर पोलिसांत आज गुन्हा दाखल झाला. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान विष्णू पारळे याला आज येथील प्रथम वर्ग न्यायालयाने 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रविवारी रात्री अकराच्या सुमारास चंद्रकांत गुलाबराव जाधव (उंब्रज, ता. कऱ्हाड) हे ट्रक (एमएच 13 ए एस 4361) मधून चिरा दगड घेऊन निघाले होते. त्या वेळी पेरीडनजीक नथुराम कांबळे व साथीदार विष्णू पारळे मोटारसायकल (एमएच 09 ईएफ 8242) वरून आले. नथुरामने आपण तहसीलदार असल्याचे सांगत ट्रकचालककडे पासची मागणी केली. पास दाखवताच हा बनावट आहे, असे म्हणत ट्रक तहसील कार्यालयाल घे सांगत माराहाण केली. गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व जबरदस्तीने चालकाच्या खिशातील दोन हजार रुपये व पास घेऊन नथूराम पळाला. दरम्यान झालेला ओरडा ऐकून जमलेल्या लोकांनी साथीदार विष्णू पारळे याल पकडले. त्याला येथील पोलिस ठाण्यात हजर केले. पळून गेलेल्या नथुराम कांबळे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस निरिक्षक विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत. कोल्हापूर

संपादन ः रंगराव हिर्डेकर