क्‍युलिंग पेपरमधून साकारल्या  इको फ्रेंडली गणेशमूर्ती 

 Eco-friendly Ganesh idols made from cooling paper
Eco-friendly Ganesh idols made from cooling paper

कोल्हापूर : कलात्मकतेचे प्रतीक म्हणून गणेशमूर्ती विविध रूपांत साकारल्या जातात. अशा नावीन्यपूर्ण व कल्पक मूर्ती बनविण्याकडे कल वाढला आहे. अशात क्‍युलिंग पेपरपासून बनविलेल्या लक्षवेधी गणेशमूर्ती वैविध्यपूर्णतेचे अनेक पैलू दर्शवितात. "स्वयंसिद्धा'च्या पद्मश्री मादनाईक यांनी साकारलेल्या या मूर्ती इको फ्रेंडली तर आहेतच; पण पुनर्वापराचे उत्तम प्रतीक म्हणून या मूर्तींची वैशिष्ट्ये आहेत. 


गणेशमूर्ती मातीपासून, शाडूपासून किंवा अन्य कोणत्याही धातूपासून बनविल्या जातात, हे सर्वश्रुत आहे. पण, मादनाईक यांनी बनविलेल्या मूर्ती कागदाच्या आहेत. हा कागद असा आहे, की जो धुता येतो, पुनर्वापर करता येतो किंवा तो दीर्घकाळ विशिष्ट कोनात "जैसे थे' ठेवता येतो. यापासून बनविलेली मूर्तिपूजा करून विसर्जन करता येते. शोकेसमध्ये ठेवता येतात. त्यांनी बनविलेल्या या विविध पद्धतीच्या, आकाराच्या मूर्तींना विशेष मागणी आहे. विशेष म्हणजे, वाद्य वाजविणाऱ्या गणेशमूर्ती ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. 

पद्मश्री यांना कल्पकतेतून विविध वस्तू तयार करण्याचा छंद. यातूनच त्या क्‍युलिंग पेपरपासून विविध वस्तू करायला शिकल्या. सुरवातीला त्यांनी आकर्षक अशा क्‍युलिंग पेपरपासून दागिने, फोटोफ्रेम, बुके, ग्रिटिंग्ज आणि राख्या तयार केल्या. त्यांनी बनविलेल्या क्‍युलिंगच्या वाद्यांचे तर आकर्षणच निर्माण झाले. यंदा त्यांनी वाद्ये हातात घेतलेल्या विविध रूपांतील आकर्षक मूर्ती त्यांनी तयार केल्या. 10 ग्रॅम वजनाच्या या मूर्ती आहेत. चार इंचापासून ते दीड फूट उंचीच्या मूर्ती त्यांच्याकडे तयार आहेत. 
हलक्‍या वजनाच्या व कोठेही सहज नेता येणाऱ्या मूर्ती गाडीत ठेवण्यासाठी, शोकेसमध्ये ठेवण्यासाठी सोयीच्या ठरतात. "स्वयंसिद्धा'च्या टाकाळा येथील स्वयंप्रेरिका होममेड शॉपीत या गणेशमूर्ती उपलब्ध असल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचा मला छंद आहे. या छंदाला वेळ देण्यासाठी मी नोकरी सोडली. क्‍युलिंग पेपरपासून वस्तू तयार करताना खूप वेळ जात असला तरी या वस्तू आकर्षक दिसतात. "स्वयंसिद्धा'च्या कांचनताई परुळेकर यांच्या प्रोत्साहनामुळे मी व्यवसाय सुरू केला. यासाठी मला पती अमित व मुलगा देवांग यांचे सहकार्य मिळते. 
-पद्मश्री मादनाईक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com