शिक्षण मंत्री म्हणतात, 'शाळा कधी सुरु होणार मला माहित नाही'....

मिलिंद देसाई | Tuesday, 28 July 2020

दररोज नवनव्या विधांनामुळे संभ्रमावस्था...

बेळगाव - शाळा कधी सुरु होणार याबाबतची अनिश्‍चितता कायम असल्याने शिक्षण खाते कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष राहिले आहे. मात्र कर्नाटक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी शाळा कधी सुरु होणार हे मला माहित नाही असे, विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाबाबत आच्छर्य व्यक्‍त केले जात आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे शाळा कधी सुरु होणार याबाबत शिक्षण मंत्री गेल्या काही दिवसांपासुन वेगवेगळ्या प्रकारची वक्‍तव्ये करीत आहेत. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे ही संभ्रमावस्था दुर करण्याची गरज असताना वेगवेगळी विधाने केली जात, आहेत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमधुन नाराजी व्यक्‍त होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णपणे दुर झाल्याशिवाय शाळा सुरु करणे सध्या तरी शक्‍य नसल्याची कल्पना सरकाराला आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत वेगवेगळी माहिती देण्यापेक्षा विद्यार्थी घरी असले तरी त्यांना कशाप्रकारे शिकविता येईल याकडे शिक्षण खात्याने लक्ष देणे आवश्‍यक आहे. 

ग्रेटच : गटारीत पडलेल्या गाढवाला बाहेर काढण्यासाठी डाॅक्टरच उतरले गटारीत...

राज्यात सध्या कोरानाचे रुग्ण मोठ्‌या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याला कोणताही निर्णय घेताना विचारपुर्वक घ्यावा लागणार आहे. सध्या सेतुबंध कार्यक्रमाच्या माध्यमातुन चंदन वाहिनीवरुन आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविले जात आहेत परंतु त्याचा विद्यार्थ्यांना किती लाभ होणार आहे हे येणाऱ्या काळात दिसुन येणार आहे. सुरुवातीला सामाजिक अंतर राखण्यासाठी सकाळी व दुपारच्या सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्याची वाढती रुग्ण संख्या पाहता अजुन काही दिवस तरी शाळा सुरु करणे शक्‍य नसल्याचे दिसुन आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक आहे असे मत व्यक्‍त होऊ लागले आहे. 
 

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे सध्या शाळांबाबत निश्‍चित काही सांगता येत नाही त्यामुळे शिक्षण मंत्र्यानी असे वक्‍तव्य केले असेल शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे शाळा सुरु करताना योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. 
- ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी  
 

संपादन - मतीन शेख