जगातील अवघड लडाख मॅरेथॉनमध्ये धावणार कोल्हापूरचे आठ सुपुत्र 

Eight sons from Kolhapur will go for Ladakh Marathon
Eight sons from Kolhapur will go for Ladakh Marathon

कोल्हापूर : समुद्रसपाटीपासून १७ हजार ६१८ फूट उंच, हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण केवळ ३० टक्के, अशी जगातील सर्वाधिक कठीण समजली जाणारी लडाख मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरचे आठ जण सरसावले आहेत. यात डॉ. संदेश बागडी, राज पटेल, जयेश पटेल, डॉ. जीवन यादव, इरफान मुल्लाणी, साहस पाटील, सूर्याजी संकपाळ, कुमार ब्रिजवानी यांचा समावेश आहे. 

या मॅरेथॉनसाठी त्यांचा कसून सराव सुरू असून, प्रत्येक दुसऱ्या आठवड्याला सरावात बदल केला जात आहे. शारीरिक क्षमतेच्या वाढीबरोबरच मानसिक आरोग्य आणि श्वसनावरील नियंत्रण वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. 

या आठ जणांच्या सरावास पहाटे चारपासून नियमितपणे सुरवात होते. धावण्याबरोबरच मासपेशींचे व्यायाम केले जातात. शिवाय, श्वसनावरील नियंत्रण, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढीसाठी योगा व प्राणायाम केले जाते. 

हे होतात सहभागी 
या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धकाला यापूर्वी कोणत्याही दोन मॅरेथॉन पाच तासांच्या आतील वेळेत पूर्ण कराव्या लागतात. हे पूर्ण करणाऱ्या स्पर्धकालाच या लडाख मॅरेथॉनमध्ये सहभाग घेता येतो.

ही स्पर्धा सर्वसाधारण मॅरेथॉनसारखी नाही. केवळ ताकद आणि क्षमता आहे म्हणून यात सहभागी होता येत नाही. यासाठी विशेष तयारी करावी लागत आहे. यात सातत्य ठेवावे लागते. ही स्पर्धा पूर्ण करण्याची अधिक कसून तयारी सुरू आहे.
- डॉ. संदेश बागडी, स्पर्धक

या स्पर्धेतील सहभागासाठी विशेष सरावाचे नियोजन केले आहे. क्षमतावाढीसाठी विविध व्यायामासह विशेष ‘डायट प्लॅन’ तयार करण्यात आला. या प्रशिक्षणाचा मानसिकता बळकट करणे हा सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा आहे.
- अश्विन भोसले, प्रशिक्षक

अशी होते स्पर्धा 
जगातील अवघड असणाऱ्या या मॅरॅथॉनची सुरवात समुद्रसपाटीपासून ११ हजार ५०० फूट उंचीवर होते. एकूण ७२ किलोमीटरच्या खडतर स्पर्धेत ३५ किलोमीटरची चढाई आहे. खारडुंग गावातून या स्पर्धेला सुरवात होते. जगभरातून यासाठी स्पर्धक येतात. खारडुंग येथे हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण हे अवघे ५० टक्के असते. येथून ३५ किलोमीटरच्या डोंगर चढाईनंतर खारडुंग येथे ऑक्‍सिजनचे प्रमाण घटून अवघे ३० टक्के राहते. समुद्रसपाटीपासून ही उंची १७ हजार ६१८ फूट आहे.


...सर्वाधिक कोल्हापूरचेच
पूर्वी कोल्हापूरच्या आदित्य शिंदे आणि रौनक पाटील यांनी २०१८ मध्ये ही मॅरेथॉन पूर्ण केली आहे. यावर्षी मॅरेथॉनसाठी आणखी आठ जण कसून सराव करीत आहेत. यामुळे ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या कोल्हापूरचीच असेल.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com