महापालिका उमेदवार निश्‍चितीसाठी मंडळातर्फे निवडणूक

 Election by the Board for confirmation of Municipal candidates
Election by the Board for confirmation of Municipal candidates

कोल्हापूर ः महापालिका निवडणुकीत मंडळाचा उमेदवार निश्‍चित करण्यासाठी देवकर पाणंद, महालक्ष्मी नगर येथील मंडळांनी निवडणुकीचे आयोजन केले आहे. जे इच्छुक आहेत, त्यांनी मंडळाकडे आपले अर्ज द्यावेत. निवडणूक घेऊन यातील एक नाव मंडळाचा उमेदवारम्हणून निश्‍चित केले जाईल, असे आवाहन राजलक्ष्मी तरुण मंडळ आणि वीर सावरकर विश्‍वस्त मंडळ यांनी केले आहे. त्यांनीच या पोटनिवडणुकीचे आयोजन केले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्येही या मंडळांनी अशा प्रकारे मतदान घेऊन आपला उमेदवार निश्‍चित केला होता. 
महापालिका निवडणूक ही अनेक अर्थांनी बहुरंगी असते. राजकीय घडामोडीं बरोबरच प्रचार, सोशल मीडियावरील टीका टिप्पणी निवडणुकीचे वातावरण आणखी गरम करतात. यामध्ये देवकर पाणंद येथील प्रभाग क्रमांक 70 राजलक्ष्मीनगर प्रभागातील राजलक्ष्मी तरुण मंडळ, वीर सावरकर विश्‍वस्त मंडळ यांनी पोट निवडणुकीचे आयोजन केले आहे. निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवार मंडळाकडे पाठिंबा मागतात. त्यामुळे कोणाला मंडळाचा उमेदवार म्हणून घोषित करायचे हा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांना पडायचा. अशा वेळी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुलकर्णी आणि इतर काही ज्येष्ठ मंडळींनी पोटनिवडणुकीची कल्पना मांडली. त्यानंतर बहुतांशी निवडणुकीत मंडळ पोटनिवडणूक घेऊन आपला उमेदवार ठरवतात. यंदाची मंडळाची निवडणूक रविवारी (ता.3) होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी (ता.29) सायंकाळी 7 वाजेपर्यंत मंडळाशी संपर्क साधून आपली नावनोंदणी करायची आहे. रविवारी सावरकर सभागृहात सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत सावरकर सभागृहात मतदान होऊन त्याच दिवशी वियजी उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. त्या उमेदवाराला राजलक्ष्मी तरुण मंडळ आणि वीर सावरकर विश्‍वस्त मंडळाचा पाठिंबा दिला जाईल. अधिकाधिक नागरिकांनी या पोटनिवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे,अशीही आगळीवेगळी पोटनिवडणूक औत्सुक्‍याचा विषय आहे. 

सर्वसाधरण प्रभागामुळे अधिक चुरस
राजलक्ष्मीनगर हा प्रभाग सर्वसाधरण झाला आहे. त्यामुळे या प्रभागात यंदा मत्तबरांची चुरस पहायला मिळणार आहे. त्या दृष्टीकोनातून मंडळातर्फे होणारी निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. 

संपादन ः यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com