esakal | घर पत्र्याचे अन् वीज बील तब्बल  93 हजार रुपये 

बोलून बातमी शोधा

Electricity bill 93 thousand rupees sangli}

या कुटुंबाचा नोव्हेंबर महिन्याचा वीज वापर सात हजारापेक्षा जास्त झाल्याचे बिलात दाखवले आहे

घर पत्र्याचे अन् वीज बील तब्बल  93 हजार रुपये 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोनानंतर वीज बिलाचा घोळ सुरुच आहे. अव्वाच्या सव्वा वीज बिल येणे हे काही नवीन राहिलेले नाही. मात्र दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीमध्ये भाड्याने राहणाऱ्या एका कुटुंबाला तब्बल 93 हजार रुपयांचे बिल आले आहे.

या कुटुंबाचा नोव्हेंबर महिन्याचा वीज वापर सात हजारापेक्षा जास्त झाल्याचे बिलात दाखवले आहे. तर डिसेंबर महिन्याचा वीज वापर थेट 21 युनिट इतकाच झाला आहे. त्यामुळे हे कुटुंब चक्रावून गेले आहे. 

वीज बिलाच्या तांत्रिक घोळामुळे कुणाला किती रकमेचे बिल हे सांगता येत नाही. येथील हरिपूर रोडवरील रामनगरमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचा गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचा वीज वापर सुमारे 50 ते 75 युनिटच्या दरम्यान राहिला आहे. तर या वर्षी याच काळात कोरोनामुळे जुलै ते सप्टेंबरपर्यंत प्रत्येकी 37 युनिट, ऑक्‍टोबरमध्ये 500 युनिट तर नोव्हेंबरमध्ये थेट 7374 युनिट इतका वापर झाल्याचे बिलावर दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये 7374 युनिट कसे आले याचे उत्तर कुणाकडे नाही. या काळातील बिल 93655 रुपये इतके आले आहे. आता नुकतेच डिसेंबर महिन्याचे बिल या कुटुंबाला आले आहे. ते केवळ 21 युनिट इतके आहे. हे कसे कमी झाले याचेही उत्तर नाही. 

हे पण वाचा - नागरिकांचीच अडवणू का?

  पांडुरंग भीमराव मगदूम असे वीज ग्राहकाचे नाव आहे. मात्र त्यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या रघुनाथ वळकल्ले या मजूराच्या कुटुंबाला हे बिल आले आहे. बिल कमी करुन घेण्यासाठी त्यांची धावाधाव सुरु आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे