रुकडीवासियांना दिलासा : 'त्या' अकरा जणांचे अहवाल निगेटिव्ह

Eleven people from rukadi corona test report are negative
Eleven people from rukadi corona test report are negative

रुकडी - रुकडी (ता. हातकणंगले ) येथील मुंबईहून आलेल्या एका युवकाचा अहवाल बुधवार (दि.२७) रोजी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला होता. यामुळे रुकडीसह परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र 'त्या' तरुणाच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे अहवाल शनिवार(दि.३०) रोजी सकाळी  निगेटीव्ह आल्याने रुकडीसह परिसरातील नागरीकांचे जीव भांड्यात पडले.
         दरम्यान,हा युवक कुटुंबियातील चार तर विलगीकरण कक्षातील सात अशा  एकूण अकरा व्यक्तींच्या संपर्कात आला होता.त्यामुळे बुधवारी उशीरा रात्रीच तातडीने  प्रशासनाने या अकरा जणांना ताब्यात घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. आज शनिवार (दि.३०) रोजी या सर्वांचे यांचे        अहवाल निगेटिव्ह असल्याचे  हातकणंगले पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी सुहास कोरे यांनी सांगितले.सध्या  अहवाल निगेटिव्ह आले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष रफिक कलावंत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com