Valentine's Day Special : मित्रानो व्हॅलेंटाईनला फुलणार महागाईचा गुलाब....

गणेश शिंदे
Wednesday, 12 February 2020

दरवर्षी 'व्हॅलेंटाईन डे' च्या पार्श्‍वभूमीवर महिनाभर आधी गुलाब निर्यातीची तयारी सुरु होते.हवामानातील बदलांचा मोठा परिणाम गुलाब उत्पादनावर झाला आहे.

जयसिंगपूर (कोल्हापूर) : 'व्हॅलेंटाईन डे' च्या पार्श्‍वभूमीवर कोंडीग्रे (ता. शिरोळ) येथील श्रीवर्धन बायोटेकमध्ये गुलाबाच्या निर्यातीसाठी धांदल सुरु आहे. मात्र, वातावरणातील बदलांमुळे यावर्षी फुलांच्या उत्पादनात किमान 25 टक्‍क्‍यांनी घट झाली असून परिणामी गुलाबांची परदेशी निर्यात निम्म्यावर आली आहे. यावर्षी केवळ पाच लाख गुलाबांचीच निर्यात होणार असून देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सात लाख गुलाबांची निर्यात होणार आहे. 

'मातीविना शेती' चा प्रयोग

हवामानातील बदलांचा मोठा परिणाम गुलाब उत्पादनावर झाला आहे. दरवर्षी 'व्हॅलेंटाईन डे' च्या पार्श्‍वभूमीवर महिनाभर आधी गुलाब निर्यातीची तयारी सुरु होते. देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशी बाजारपेठेतही 'श्रीवर्धन' च्या गुलाबाला चांगली मागणी असते. 'मातीविना शेती' च्या प्रयोगातून साकारलेल्या येथील फुलांना जपान, ग्रीस, ऑस्ट्रेलिया आणि इटलीच्या बाजारपेठेतूनही चांगली मागणी असते. शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यान पंडीत गणपतराव पाटील यांच्या कल्पकतेतून कोंडीग्रेच्या माळरानावर गुलाबांचा मळा फुलला आहे.

हेही वाचा- धक्कादायक; जीएसटीच्या राज्यकर अधिकाऱ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात -

 उत्पादनात 20 ते 25 टक्‍क्‍यांनी घटले
'व्हॅलेंटाईन डे' साठी अधिकाधिक फुलांची निर्यात करुन परदेशी चलन मिळविण्याची चांगली संधी असते. मात्र, यावर्षी वातावरणातील बदलांमुळे उत्पादनात 20 ते 25 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. 'श्रीवर्धन बायोटेक' मध्ये सुमारे वीस प्रकारच्या गुलाबांचे उत्पादन घेतले जाते. यातील लाल रंगाच्या गुलांबांना सर्वाधिक मागणी असते. पॅशन,फस्ट्रेड, टेम्टेशन, ग्रॅडगाला, रॉयल बकारा आदी प्रकारच्या फुलांना विशेष मागणी असते. याशिवाय जर्बेरा, कार्नेशन, कॅप्शिकम, ऑर्केड आदी फुलांनादेखील वर्षभर मागणी असते.

हेही वाचा- जीएसटीचे राज्यकर अधिकारीसह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात -

  देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष
फुलांची तोडणी केल्यापासून देश-विदेशातील बाजारपेठेत ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत फुलांची विशेष काळजी घेतली जाते. अर्धवट उमललेल्या कळ्या तोडल्यापासून त्यांचा उन्हाशी संपर्क न आणता त्या दोन ते पाच अंश सेल्सियस तापमानात कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवल्या जातात. त्यामुळे कळ्या उमलण्याची प्रक्रिया थांबते. सामान्य तापमानात आल्यानंतर कळ्या उमलण्याची प्रक्रिया सुरु होते. दरवर्षी अधिकाधिक उत्पादनासाठी प्रयत्न सुरु असतात. मात्र, वातावणातील बदलाचा फटका बसल्याने यावर्षी उत्पादनात घट झाल्याने परदेशी बाजारपेठेपेक्षा देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 

हेही वाचा- कोल्हापुरमध्ये तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या -

थंडी गायबचा फटका 
यावर्षी उच्चांकी पाऊस आणि महापुराच्या स्थितीनंतरही थंडीअभावी फुल शेतीला फटका बसला. उष्म वातावरणामुळे कळ्या नैसर्गिक पध्दतीने फुलत गेल्यामुळे 'व्हॅलेंटाईन डे'साठी अधिकाधिक फुलांच्या निर्यातीचे गणित कोलमडले. 

हेही वाचा- कोल्हापुरमध्ये तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या -

देशांतर्गत बाजारात दर कोसळण्याची स्थिती 
वातावरणातील बदलांमुळे गुलाबाच्या उत्पादनांत घट झाली आहे. परिणामी परदेशातील बाजारपेठेत फुलांची निर्यात करण्यापेक्षा देशांतर्गत बाजारात फुलांची विक्री करण्यावर उत्पादकांचा भर राहणार आहे. तसे झाल्यास बाजारात फुलांची आवक वाढून दर कोसळण्याची शक्‍यता आहे. 

थंडी नसल्याने उत्पादनावर परिणाम
बदलत्या वातावरणामुळे गुलाबांच्या उत्पादनात 20 ते 25 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. यामुळे परदेशातील निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. पाच लाख लंडनला निर्यात केली जाणार असून सात लाख गुलांबाची देशांतर्गत दिल्ली, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, पुणे, मुंबई अशा देशांतर्गत बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. थंडी नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

- रमेश पाटील (सीईओ, श्रीवर्धन बायोटेक, कोंडीग्रे)  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: exports of roses abroad account for half this year kolhapur marathi news