Inspiring: बारा वर्षांत सात आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवून कोल्हापूरच्या लौकिकात घातली भर

नंदिनी नरेवाडी-पाटोळे  | Wednesday, 13 January 2021

रसायनशास्त्रातील प्रयोगांची प्रक्रिया सुलभ प्लॅटिनमला दिला पर्याय; प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांची सात पेटंटमध्ये भरारी

कोल्हापूर :  रसायनशास्त्रातील विविध प्रयोग करताना ती प्रक्रिया सोपी- सुलभ व्हावी, यासाठी प्लॅटिनमचा वापर करावा लागतो. प्लॅटिनमच्या वापरामुळे ही प्रक्रिया खर्चिक तर असतेच, शिवाय प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी प्लॅटिनमला कमी खर्चिक व प्रदूषणाला टाळणारा पर्याय उपलब्ध करून देण्याची किमया कोल्हापूरच्या प्रा. डॉ. भालचंद्र आनंदा काकडे यांनी साधली आहे. इंधनातील वैविध्यपूर्ण संशोधनातून त्यांची प्रतिमा जागतिक स्तरावर आकाराला आली. बारा वर्षांत तब्बल सात आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवून त्यांनी कोल्हापूरच्या लौकिकात भर घातली आहे. 

त्यांच्या नावावर विविध देशांचे सात पेटंट कोरले आहेत..पदव्युत्तर शिक्षण घेताना भारत सरकारच्या ‘यूजीसी’कडून मिळालेल्या फेलोशिपच्या आधारे त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळेतील या संशोधनानंतर त्यांना पुन्हा जपानमधील टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथून इंधनातील संशोधनासाठी पुन्हा फेलोशिप मिळाली. तेथील पाच वर्षांच्या संशोधनात त्यांनी अमेरिका, जपान, युरोप या देशांमधून सहा पेटंट मिळविले. 

चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांना प्राध्यापक व संशोधक म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी पीएच.डी.चे शिक्षण घेत आहेत. डॉ. काकडे मूळचे निपाणीचे. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. एम.एस्सी. पूर्ण झाल्यावर त्यांना ‘यूजीसी’कडून संशोधनासाठी फेलोशिप मिळाली. 

Advertising
Advertising

हेही वाचा- सफारी नाही आता वर्दीवरच ड्यूटी ;  रुबाब येणार कमी, बंदोबस्त जादा -

मिळविलेले पेटंट असे :
    केमिकली ऑडर्ड इलेक्‍टोकॅटॅलिसीस फॉर फ्युएल सिल (भारत, २०२०)
    कंपोझिशन विथ एनहान्सड प्रोटोन कंडक्‍टिविटी (अमेरिका, २०१३)
    इलेक्‍ट्रो मटेरियल्स फॉर फ्युएल सेल (जपान, २०१३)
    कंपोझिशन विथ एनहान्स्ड प्रोटोन कंडक्‍टिविटी (युरोप, २०१०)
    थ्रीडी नेटवर्क ऑफ ग्राफिन ऑक्‍साईड अॅण्ड कार्बन नॅनोरीबॉन फॉर सुपर कॅपेसिटर (जपान २०१२)
    आयनोरिक प्रोटोन कंडक्‍टर झेडआरएस कोटिंग ऑन कार्बन नॅनोट्युबस (जपान २०१२)
    मेटल नॅनो पार्टिकल्स अॅण्ड फॅब्रिकेशन (जपान २००९)

संपादन- अर्चना बनगे