रेल्वे स्थानकात आता टॉयलेट कॉम्प्लेक्‍सची सुविधा 

शिवाजी यादव 
Thursday, 28 January 2021

थायसन ग्रुप कंपनीच्या सहयोगाने ही सुविधा तयार केली आहे. या शौचालय इमारतीचा आकार रेल्वेच्या डब्ब्या प्रमाणे आहे

कोल्हापूर - येथील रेल्वे स्थानकावर टॉयलेट कॉम्प्लेक्‍स सुविधा नव्याने सरू करण्यात आली. खासदार संजय मंडलीक यांच्या हस्ते  तर आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत या सेवेचे उद्घघाटन झाले. महिला, पुरूष व दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र, सुरक्षित, अधुनिक प्रकारची सुविधा असलेले ही शौचालय सुविधा आज वापरासाठी खुली झाली. 

थायसन ग्रुप कंपनीच्या सहयोगाने ही सुविधा तयार केली आहे. या शौचालय इमारतीचा आकार रेल्वेच्या डब्ब्या प्रमाणे आहे. तो दिसण्यास आकर्षक व स्वच्छ आहे. 

अंर्तरचनेत 7 स्वच्छता गृह, 8 शौचालये, 7 बाथरूम व कपडे बदलण्याचे कक्ष अशा सुविधा आहेत. एण्टी स्कीड टाईल्स या प्रकारची फरशी बसवली. 

परराज्यातून तेच परजिल्ह्यातून बहुतांशी पर्यटक भाविक कोल्हापूरला येतात तेव्हा त्यांना रेल्वेतून उतरल्यानंतर स्वच्छतागृहाची सुविधेचा लाभ घेता यावा तसेच त्यासाठी चांगल्या दर्जाची सुविधा असावी या हेतून हा शौचालय कॉम्प्लेक्‍स अधुनिक सुविधा नियुक्त बनविला आहे त्याचा वापर सशुल्क असणार आहे. याकक्षातील सुविधा घेऊन स्वच्छ होऊन पर्यटकांना दिवसभर कोल्हापूर दर्शन सेवेचा लाभ घेता येणार आहे. 

हे पण वाचानादच खुळा! कोल्हापूरच्या साबळेवाडीतील पती-पत्नीने घडविला इतिहास, संपूर्ण गावात होतेय चर्चा

या उध्दघाटन प्रसंगी मंडल रेल्वे प्रबंधक रेणु शर्मा, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, थायसन ग्रुपचे सीईओ विवेक भाटिया, महापालिका आयुक्त संदीप घाटगे, विमानसेवेचे कमलकुमार कटारिया आदी उपस्थित होते. 
                       
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facility of toilet complex kolhapur railway station