शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पंचवीस किलोमीटरचा अखंड दंडवत, पाहा व्हिडीओ

farmers demands Twentyनfive kilometers of continuous bowing gadhinglaj kolhapur farmer act agriculture marathi news
farmers demands Twentyनfive kilometers of continuous bowing gadhinglaj kolhapur farmer act agriculture marathi news

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्णत्वासाठी आज भारतीय जनता पार्टीचे गडहिंग्लज तालुका सरचिटणीस  अजित लक्ष्मण जामदार रा . कडगांव यांनी आज कोल्हापुरातील दसरा चौक ते श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ता. पन्हाळा असा पंचवीस किलोमीटरचा अखंड दंडवत घातला.
 कडक  तापलेले डांबरी रस्ते , प्रचंड उन्हाच्या झळा , अंगातून गळणारा घाम  तरीही अनवाणी पायाने जीवाची परवा न करता श्री जामदार यांनी भर उन्हातून दंडवत करण्यास सुरुवात केली. 


सायंकाळी साडे सहा वाजता दंडवत घालत श्री जामदार जोतिबा डोंगरावर पोहोचले. दरम्यान ते दंडवत घालत जात असताना त्यांच्या श्रद्धेला अनेकानी सलाम  केला. कोल्हापूर जोतिबा मार्गावर ठिक ठिकाणी त्यांची  विचारपूस करून  शेतकऱ्यांनी कौतूक केले . कुशिरे तर्फ ठाणे गावातून जोतिबाकडे जाताना कच्चा रस्ता डोंगर पठार लागले. काट्याकुट्यातून त्यांना दंडवत घालवा लागला.  

गायमुख तलाव या ठिकाणी साडेचार वाजता पोहचले . तेथून तापलेल्या वळण रस्तामार्गे चव्हाण तळे एसटी बस स्थानक परिसरातून ठाकरे मिटके गल्लीतून मुख्य मंदीराच्या ठिकाणी आल्यावर जामदार यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करून आनंद व्यक्त  केला.जामदार यांनी मुख्य मंदिर परिसरात  अंघोळ करून श्रींचे दर्शन घेतले. 


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com