येथे होत आहे शेतकऱ्यांसाठी थेट बांधावर जाऊन जागर...

सकाळ वृत्त सेवा
Wednesday, 8 July 2020

शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध उपयुक्त योजना त्याचबरोबर पीक संरक्षणाबद्दल थेट माहिती देण्यात आली

इचलकरंजी (कोल्हापूर ) :  कृषी संजीवनी सप्ता अंतर्गत हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले मंडल कृषी अधिकारी अंतर्गत 22 गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी थेट बांधावर जाऊन जागर कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध उपयुक्त योजना त्याचबरोबर पीक संरक्षणाबद्दल थेट माहिती देण्यात आली. या उपक्रमात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवला. 

   महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 ते 7 जुलै  हा कृषी संजीवनी सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला या कालावधीत कोव्हीड  19 चे पालन करून बांधावर जाऊन कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन योग्य तंत्रज्ञानाने कसे घेता येईल याबाबतची माहिती देण्यात आली. त्याच बरोबर पंतप्रधान विमा योजना, हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पंतप्रधान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याबाबत ही माहिती देण्यात आली. जमीन आरोग्य पत्रिका अंतर्गत माती नमुना अहवालानुसार रासायनिक व शेंद्रीय खतांचा संतुलित वापर कशा पद्धतीचे करण्यात यावा याबाबतची माहिती देण्यात आली. मका पिकाला त्रास देणारी लष्करी अळी, उसावरील मोठ्याप्रमाणात भेडसावणारी हुमणी कीड, खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग भात आडसाली लावण ऊस लावण पीक पद्धती व पीक संरक्षण तसेच लागवडीच्या पद्धती बाबतची माहिती देण्यात आली.

हेही वाचा -ब्रेकिंग - इचलकरंजीत कोरोनाचा सहावा बळी

त्या बाधित डाॅक्टरच्या पत्नीलाही कोरोनाची लागण

वाचा सविस्तर... 

 कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने शेती करावी याची ही माहिती कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथील डॉ.  निनाद वाघ यांच्यामार्फत देण्यात आली. संतुलित रासायनिक व सेंद्रिय खताचा योग्य पद्धतीने कशा कसा वापर करावा याची ही माहिती देण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत गांडूळ खत, नाडेप खत, शेततळे, फळबाग लागवड बाबत जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर आपत्कालीन पीक योजना याबाबत माहिती देण्यात आली शेतकऱ्यांची शिवार फेरी व नाविन्यपूर्ण प्लॉटला भेटी देण्यात आल्या जनावरांचे दुग्धोत्पादन वाढीसाठी हायड्रोपोनिक चारा निर्मिती ची विस्तृत माहिती या उपक्रमांतर्गत देण्यात आली. प्रभारी मंडळ कृषी अधिकारी आर व्ही परीट तालुका, कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी, आत्माच्या प्रकल्प संचालिका सुनंदा कुऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले.  सर्व गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच अन्य शेतकऱ्यांचे यासाठी सहकार्य लाभले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For farmers go directly to the dam and wake up