शिरोळ तालुक्‍यात 399 जागांसाठी चुरस

Fierce Battle For 399 Seats In Shirol Taluka Kolhapur Marathi News
Fierce Battle For 399 Seats In Shirol Taluka Kolhapur Marathi News

शिरोळ : तालुक्‍यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 242 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत व चुरशीने झाली. प्रत्येक केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक मोहीम राबविताना मतदारांचे थर्मल स्कॅनिंग, सॅनीटायझरचा वापर करुन मतदान केंद्रात सोडले. दुपारी साडे चार वाजेपर्यंत सुमारे 80 टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. सायंकाळी साडेपाच वाजता 399 जागांसाठी 992 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. 

शिरोळ तालुक्‍यातील आलास, अर्जुनवाड, बस्तवाड, बुबनाळ, चिपरी, दानोळी, जुने दानवाड, दत्तवाड, धरणगुत्ती, गणेशवाडी, गौरवाड, घालवाड, घोसरवाड, हसुर, जैनापूर, जांभळी, कवठेगुलंद, कोंडीग्रे, कोथळी, कुटवाड, मजरेवाडी, नांदणी, निमशिरगाव, नृसिंहवाडी, शेडशाळ, शिरदवाड, शिरटी, शिरढोण, टाकळीवाडी, तमदलगे, तेरवाड, उदगाव, यड्राव या 33 ग्रामपंचायतीच्या 399 जागेकरीता 992 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. 

अनेक ठिकाणी एकाच भावकीतील उमेदवार परस्पराच्या विरोधात निवडणुक रिंगणात होते. यड्राव, दानोळी, नांदणी, धरणगुत्ती, अर्जुनवाड, टाकळीवाडी, कवठेगुलंद, आलास येथे मतदारांना घराबाहेर काढुन मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी इर्षा सुरु होती. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे कोठेही अनुचीत प्रकार घडला नाही. आरोग्य विभागाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदाराचे थर्मल स्कॅनिंग करुन मतदारांचे हात सॅनिटायझर करुन केंद्रात सोडत होते. वयस्कर मतदारांनीही नातेवाईकांच्या मदतीने मतदान केले.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com