esakal | दोन गटात मारामारी ; 17 संशयितावर गुन्हे दाखल

बोलून बातमी शोधा

Fights in two groups 17 suspects charged crime marathi news kolhapur}

सडोली दुमाला (ता. करवीर) येथे फुटबॉल खेळताना जवळून गेल्याच्या कारणावरून दोन गटात मारामारीचा प्रकार

दोन गटात मारामारी ; 17 संशयितावर गुन्हे दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  सडोली दुमाला (ता. करवीर) येथे फुटबॉल खेळताना जवळून गेल्याच्या कारणावरून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
 सडोली दुमाला येथे शनिवारी सायंकाळी फुटबॉल खेळताना जवळवून गेल्याच्या कारणावरून दोन गटात मारामारी झाली. यात दगड व काठीचा वापर करण्यात आला. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी 17 संशयितावर गुन्हे दाखल करण्यात आले. 

हेही वाचा- कसाल मंडळ अधिकारी संदीप हांगे निलंबित

रूपेश विलास पोवार यांनी दिलेल्या फिर्यादे नुसार संशयित ऋषिकेश कांबळे, जालिंदर कांबळे, अपर्णा कांबळे, हर्षद अतिग्रे, बालाजी अतिग्रे, विकास कांबळे, प्रथमेश पारखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ऋषिकेश जालिंदर कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित रूपेश पोवार, राहूल पोवार, जयदीप पोवार, सुदेश पोवार, रोहीत पोवार, नितीन पोवार, दीपक पोवार, आनंदा पोवार, विलास पोवार व संकेत पोवार याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. 

संपादन- अर्चना बनगे