लोककला महोत्सव 26,27 रोजी

Folklore Festival on 26,27
Folklore Festival on 26,27

कोल्हापूर : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दरवर्षी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र शासनाने "लोकसाहित्य : उत्सव मराठीचा' ही संकल्पना देऊन लोकसाहित्याशी निगडित कार्यक्रम करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार विद्यापीठाने बुधवारी (ता.26) व गुरुवार (ता.27) रोजी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

26 ला दुपारी 12 वाजता लोककला महोत्सव होईल. जात्यावरील ओव्या (सावित्रीबाई लोककला पथक, धंदवडे), धनगरी ओव्या (बिरदेव भैरुसिद्ध ओवीकार मंडळ, कुरळप), गजनृत्य (बिरोब गजनृत्य वागूल मंडळ, आरेवाडी), गणगवळण (शाहीर सुरेश कांडगावकर आणि सहकारी), लावणी आणि बैठकीची लावणी (सुनीता कांडगावकर आणि सहकारी), भेदिक शाहिरी (शाहिर हिंदुराव पाटील आणि सहकारी), राष्ट्री शाहिरी (शाहीर रंगराव पाटील आणि सहकारी), झिम्मा फुगडी (जिजाऊ लोककला व लेझीम पथक, धुंदवडे), पोतराज (अंकुश कसबे), वासुदेव (रणवीर वासुदेव) कलाप्रकार सादर केले जातील. 27 ला "उत्सव माय मराठीचा' हा मराठी लोकगीतांचा सांगितिक कार्यक्रम आणि "रेडिसो बटाटा' ही लघुनाटिका शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागातर्फे सादर केली जाणार आहे. 

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित राहतील. दोन्ही कार्यक्रम विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर सभागृहात होतील. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com