esakal | एकनाथ खडसे आमचे नेते ते पक्ष सोडणार नाहीत ; चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

former minister eknath khadse will not join the ncp information form bjp state president chandrakant patil

माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ खडसे आमचे नेते ते पक्ष सोडणार नाहीत ; चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एकनाथ खडसे यांना राजकीय जाण तर आहेच पण ते समजुतदारही आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. पक्षाची हानी होईल अशी कोणतीही कृती ते करणार नाही. खडसे आमचे नेते आहेत ते पक्ष सोडणार नाहीत. असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 


माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नाराजीनाट्य सुरू आहे. घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. सुरुवातीला त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी दिली जाईल. तर नंतर त्यांना कृषी मंत्रीपद देण्यात येईल. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,"एकनाथ खडसे आमचे नेते आहेत. राजकारणात प्रत्येकाची काही ना काही अपेक्षा असते. आपल्याला सन्मान मिळावा अशीही अपेक्षा असू शकते.

हेही वाचा- Kolhapur Rain Update : राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली ; कळंबा तलाव ओव्हरफ्लो -

खडसे यांच्याशी गेल्या गेल्या पाच वर्षांपासून माझी चर्चा सुरू आहे. काही वेळा आपल्याला जे अपेक्षित असते असे होतेच असे नाही. पण खडसे हे अतिशय समजुतदार राजकारणी आहेत. आमच्यासाठी ते नेते आहेत. पक्षाची हानी होईल अशी कोणतीही कृती ते करणार नाहीत. प्रसारमाध्यमातूनच या चर्चा सुरू आहेत. पण खडसे पक्ष सोडणार नाहीत. त्यांची नाराजगी दूर होईल. एक - दोन आठवड्यात सर्व काही सुरळीत होईल.' असा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.  

संपादन - अर्चना बनगे