माजी रणजीपटू, कोल्हापूर संघांचे अष्टपैलू, डावखुरे खेळाडू ध्रुव केळवकर यांचे निधन

युवराज पाटील | Wednesday, 12 August 2020

कोल्हापुरातील मोजक्याच रणजीपटूत केळवकर यांचा समावेश होतो. त्यांच्या फलंदाजीचे कौशल्य आजही अबाधित आहे.

कोल्हापूर :  कोल्हापुरातील प्रसिद्ध क्रिकेटपटू व माजी रणजीपटू ध्रुव केळवकर वय 53 यांचे आज निधन झाले. कोल्हापुर  क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ते कार्यरत होते. महाराष्ट्र संघाकडून  त्यांनी आपले कसब दाखविले. शाहूपुरी संघाकडून जिल्हा क्रिकेट संघटनेचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. निवड समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. ज्युनियर क्रिकेटपटू घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.कोल्हापुरात शाहूपुरी जिमखाना आणि केळकर असे समीकरण तयार झाले होते.

कोल्हापुरातील मोजक्याच रणजीपटूत केळवकर यांचा समावेश होतो. त्यांच्या फलंदाजीचे कौशल्य आजही अबाधित आहे. क्रिकेटमध्ये ग्रास रूटवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. विविध क्रिकेट स्पर्धेत अलीकडच्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये ज्या तरुण क्रिकेटपटूने नाव कमावले त्यांच्या जडणघडणीत केळकर यांचा मोठा वाटा होता. उभी हयात क्रिकेटसाठी समर्पित करणाऱ्या केळकर यांच्या निधनामुळे आजी-माजी क्रिकेटपटूंना तसेच कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला मोठा धक्का बसला.एक जाणकार अनुभवी क्रिकेटपटू गमावल्याची भावना व्यक्त  होत आहे.

हेही वाचा- कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी के. पी.पाटील -

कोल्हापूर महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी जे काही मोजके खेळाडू गेले त्यात केळकर यांचा समावेश होता शास्त्रशुद्ध फलंदाजी हे केळकर यांचे वैशिष्ट्य होते.रमेश कदम, मिलिंद कुलकर्णी असे नामवंत पुढे क्रिकेटपटू कोल्हापुरात घडले. भाऊसाहेब निंबाळकर कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम निर्माण केला. एस आर पाटील, बी आर पाटील असे नामवंत क्रिकेटपटू येथे घडले त्यांचा पुढील वारसा केळकर यांनी जास्तीत जास्त रणजी खेळाडू घडले पाहिजेत वेगवेगळ्या वयोगटात कोल्हापूरच्या खेळाडूंनी नेतृत्व करायला हवे होते यासाठी केळकर आग्रही होते.

संपादन - अर्चना बनगे