चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला 

Four pickled chicken, twelve mango spices
Four pickled chicken, twelve mango spices

कोल्हापूर  : "चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला" अशा आशयाची एक म्हण आहे, आणि ही म्हण आता शब्दश: कोंबडीच्या स्वस्त दरामुळे प्रत्यक्षात उतरली आहे. कोल्हापूर परिसरात कोंबडीचे मटण 70 ते 80 रुपये किलोवर आले आहे. 
आणि 70-80 रुपयाची एक कोंबडी बनवण्यासाठी नारळ, तेल, सुके खोबरे, तीळ, खसखस, कांदा, आले ,लसून ,कोथिंबीर, हळद ,चटणी आणि गरम मसाला याचा खर्च 150 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे चार आण्याची कोंबडी आणि ही म्हण अनुभवण्याची वेळ आली आहे. 

अर्थात चीनमधील कोरोना या संसर्ग आजाराचा आणि चिकनचा संदर्भ जोडले गेल्यामुळे चिकन विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. चिकनचे दर दुकानागणिक बदलले आहेत. चिकन स्वस्तात स्वस्त दरात मिळू लागले आहे. कोरोना आणि चिकन याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, हे सांगून चिकन विक्रेते थकले आहेत. पण तूर्त तरी चिकनपेक्षा कोरोनाचाच प्रभाव लोकांच्यावर अधिक आहे. 

कोल्हापुरात मटणाचा दर 520 रुपये किलो आहे. पण हळूहळू तो 540 रुपयापर्यंत काहींनी नेला आहे. मटणाच्या या दरामुळे चिकन खाणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात चांगलीच आहे. चांगले चिकन 180 ते 200 रुपयापर्यंत विकणारीही दुकाने आहेत. पण पंधरा वीस दिवसात कोरोना या संसर्ग आजाराच्या निमित्ताने चिकन आणि कोरोनाचा संसर्ग अशी चर्चा सुरू झाली. भराभर ती व्हायरलही झाली. त्याचा परिणाम चिकनच्या दरावर ही झाला. ग्रामीण भागात तर 60 ते 70 रुपये किलोवर चिकनचा दर आला आहे. कोल्हापूर शहरातही किलोमागे तब्बल 40 ते 50 रुपयांनी दर कमी झाला. पण तरीही चिकन विक्रीवर परिणाम कायम राहिला आहे.  या पार्श्वभूमीवर चिकन विक्रेत्यांनी एकत्र येऊन चिकन आणि कोरोनाचा काडीचाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

उद्या चिकन फेस्टिव्हल 
खुद्द राज्याचे पशुधन मंत्री सुनील केदार यांच्या मुलाखतीतून ही त्यांनी हे स्पष्ट केले आहे. तरीही चिकन बद्दल भीतीची किनार अद्याप कायम असल्याने चिकन विक्रेत्यांनी शुक्रवारी (ता.28) रोजी चक्क चिकन फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. 50 रुपयात चिकन बिर्याणी आणि मंचुरीची पोटभर डिश देण्यात येणार आहे. चिकन बद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी हा पदरमोड करून अभिनव उपक्रम चिकन विक्रेत्यांना हाती घ्यावा लागला आहे. 

चिकन फेस्टिवल चिकनबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी आयोजित केले आहे. शुक्रवारी सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलच्या पटांगणात हा फेस्टिवल होईल. या फेस्टिवलमध्ये चिकन बिर्याणी, मंचूरियन याबरोबरच स्वच्छतेला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. जब्बर देसाई , इरफान मोमीन, शकूर मोमीन, हनिफ थोडगे, समीर मुलाणी, फक्रुद्दीन मुजावर यांनी या फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. 
- जब्बर देसाई. चिकन फेस्टिवल संयोजक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com