गिफ्ट कार्डद्वारे मॉलमधून 50 टक्के सवलत देऊ म्हणत केली 14 लाखांची फसवणूक

fraud from father and son for 14 lakh rupees in kolhapur
fraud from father and son for 14 lakh rupees in kolhapur

कोल्हापूर : गिफ्ट कार्डद्वारे मॉलमधून 50 टक्के सवलतीने वस्तू खरेदी करा असे अमिष दाखवून 14 लाखांहून अधिकची फसवणूक प्रकरणी मुंबईतील बाप लेकावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याबाबत फसवणूक झालेल्या सात जणांच्यातर्फे असिफ सैदुल्ला पुणेकर (वय 49, रा. नागाळा पार्क) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे : अविष्कार सुनील पाटील (वय 29) व वडील- सुनील पाटील (दोघे रा. वरळी मुंबई) अशी आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, आसिफ पुणेकर हे नागाळा पार्क येथे राहतात. त्यांच्या भागात संशयित अविष्कार पाटील व सुनील पाटील हे राहण्यास आले होते. त्यातून त्यांची त्या दोघांबरोबर ओळख झाली. संशयित अविष्कारने आपले वडील संशयित सुनील पाटील हे रिझर्व बॅंकेत नोकरीस आहेत. त्यांना दिवाळी निमित्त एका मॉलचे गिफ्ट कार्ड मिळाले आहे. कार्डद्वारे संबधित मॉलमधून कोणतीही इलेक्‍ट्रीक वस्तू 50 टक्के सवलतीने खरेदी करता येते असे अमिष दाखवले. 

त्या पद्धतीने त्याने या भागातील आणखी सहा जणांना कार्डचे अमिष दाखवले. त्याच्यावर विश्‍वास ठेऊन पुणेकर यांनी त्याला टप्प्याटप्याने असे 3 लाख 75 हजार रूपये दिले. तसेच या भागातील अन्य सहा जणांकडून सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर 2020 अखेर ऑनलाईन, रोखीने असे एकूण 14 लाख एक हजार रूपये घतले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांना कोणत्याही इलेक्‍ट्रीक अगर इतर वस्तू न त्यांनी दिल्या नाहीते. ते दोघे कोणालाही न सांगता पसार झाले. अशी फिर्याद पुणेकर यांनी दिली. त्यानुसार वरळी मुंबईतील संशयित अविष्कार व त्याचा वडील सुनील पाटील या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com