मार्क वाढवण्याच्या आमिषाने २२ हजारांना गंडा

fraud of rs 22 000 in lure of increasing marks in ichalkaranji
fraud of rs 22 000 in lure of increasing marks in ichalkaranji

इचलकरंजी - दहावीच्या परीक्षेत ऑनलाईन मार्क वाढविण्याचे आमिष दाखवून २२ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. प्रेम बाळासो पाटील, ओमकार दत्ता डाकरे (दोघेही कोले मळा), सुमित देशमाने (सनी कॉर्नर, कबनूर), अनिकेत जिवंधर केटकाळे (सत्यराज वाचनालयाजवळ, कबनूर) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबतची तक्रार कृष्णात आत्माराम गोते (परिट गल्ली, कबनूर) यांनी दिली आहे. गोते यांचा मुलगा कौस्तुभ हा दहावीमध्ये शिकत असताना संशयित प्रेम पाटील याने परीक्षेत कॉपी पुरवितो तसेच ऑनलाईन मार्क वाढवितो असे सांगून २२ हजार ५०० रुपये उकळले. पैसे परत मागू नये, यासाठी उर्वरित तीन संशयितांनी वेळोवेळी कौस्तुभ याला मारहाण केली. हा प्रकार कौस्तुभच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी आज याबाबतची तक्रार शिवाजीनगर पोलिसांत दिली. याबाबत अद्याप कोणासही अटक झालेली नाही.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com