गड भटकंतीची मैत्रीपूर्ण चळवळ! 

A friendly wandering movement of gad travelling !
A friendly wandering movement of gad travelling !

कोल्हापूर : गडकोट, डोंगर-दऱ्या, अरण्ये भटकणाऱ्यांची एक चळवळ म्हणजे मैत्रेय प्रतिष्ठान. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांना गडकिल्यांच्या भटकंतीचे वेड आहे. एक दिवसीय व अखंड रात्र "पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती' मोहिमेचे आयोजन करणारी त्यांची संस्था आहे. दुर्गसंवर्धनासाठी संस्थेने उचललेले पाऊल महत्त्वपूर्ण असून, दरवर्षी भटकंतीतून गड स्वच्छतेचा उपक्रम ठरलेला असतो. 

डॉ. अडके गेली तीस वर्षांहून अधिक काळ गडकोटांची भटकंती करत आहेत. केवळ भटकंती न करता ते गडकोटांचा अभ्यासही करतात. व्याख्यानातून त्याचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोचवत असून, दुर्ग संवर्धन कसे करावे, याची माहिती देत आहेत. सह्याद्रीच्या अंतरंगातील प्राचीन घाट वाटांचा अभ्यासपूर्ण मागोवा ते घेत आहेत. परिचित-अपरिचित शेकडो घाट वाटांची भटकंती त्यांनी सहकाऱ्यांच्या सोबतीने केली आहे. डोंगर व अरण्ययात्रा हेही प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य आहे. 

डॉ. अडके एकटेच गडकिल्ल्यांच्या भटकंतीला बाहेर पडत होते. कार्यकर्त्यांचे संघटन करत त्यांनी मैत्रेय प्रतिष्ठानच्या स्थापनेतून गड संवर्धनाचा विचार त्यांच्यात रूजवला आहे. भटकंतीतून गडांची असंख्य चित्रे त्यांनी कॅमेऱ्याद्वारे टिपली आहेत. त्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. त्यातील दुर्मिळ व निवडक गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे "गडकोट माझे सांगाती' प्रदर्शन साकारले आहे. ते राज्यात ठिकठिकाणी भरविले जाते. त्याचा स्लाईड शो ही तयार केला आहे. दुर्ग स्वच्छतेतून दुर्ग संवर्धन संस्थेचा विशेष उपक्रम आहे. स्थानिकांद्वारे दुर्गसंरक्षण व संवर्धन उपक्रम संस्थेतर्फे राबविला जातो. 

पन्हाळा ते पावनखिंड मोहीम एका रात्रीत पूर्ण करण्याचा आगळावेगळा उपक्रम ते दरवर्षी करतात. पन्हाळ्याहून रात्रीच्या वेळी ते बाहेर पडतात. मोहीमवीरांना सोबत घेऊन त्यांचा हा प्रवास सकाळी पूर्ण होतो. दुर्ग अभ्यासातून अरण्यातील वाटांची माहिती असणाऱ्या वाटाड्यांचा सत्कार करण्यालाही ते महत्त्व देतात. विशेष म्हणजे कोल्हापुरातील शिवाजी पूल ते जोतिबा डोंगर हा रविवारचा पायी प्रवास करण्यात ते चुकत नाही. गड भ्रमंतीच्या निमित्ताने कोल्हापुरात नसतील, तरच त्यात खंड पडतो. 

मैत्रेय प्रतिष्ठान 
* अध्यक्ष - डॉ. अमर अडके 
* उपाध्यक्ष - डॉ. विश्‍वनाथ भोसले, सम्वयक - सागर आफळे, कार्यवाह - राजेश पाटील, संघनायक प्रमुख - यशपाल सुतार. 
संचालक - मधुसुदन तांबेकर, डॉ. पुंडलिक पोवाळकर, प्रकाश कुंभार, संजय पाटील, डॉ. दीपक आंबर्डेकर, डॉ. चिंतामणी खरे, डॉ. अतुल साठ्ये, सुचित हिरेमठ, अमित बोकील, शिवप्रसाद स्वामी, रितेश मोरे, उदय कुलकर्णी, डॉ. विशाल किल्लेदार, पुरूषोत्तम जामदार, अपूर्वा लोंढे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com