अंध मित्राची दिवाळी झाली गोड

Friends Help Blind Friend On Diwali Kolhapur Marathi News
Friends Help Blind Friend On Diwali Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांची दृष्टी गेली. अंधकार परसलेल्या जीवनाची गाडी ते कसेबसे चालवित आहेत. अशा अडचणीच्या परिस्थिती कोणालाही मित्रांचाच आधार असतो. सरोळी (ता. आजरा) येथील बाळासाहेब सुतार यांच्या बाबतही तेच झाले. सरस्वती विद्या मंदिरच्या 1985-86 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत देत आपला वर्गमित्राची दिवाळी गोड केली. 

बाळासाहेब सुतार सर्वसामान्य कुटुंबातील. चौथीला असताना त्यांची दृष्टी गेली. त्यामुळे शिक्षणही सुटले. जीवनात अंधार पसरला पण, जिद्दीने आयुष्याची वाटचाल सुरू आहे. दरम्यान, इचलकरंजी येथे स्थायीक असलेले त्यांचे वर्गमित्र जयसिंग केसरकर दिवाळी सणाला गावी आले होते. बाळासाहेब यांच्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या. स्वत:ची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसतानाही त्यांनी बाळासाहेब यांना 10 हजार रूपयांची मदत केली. मात्र, ही मदत तोकडी असल्याचे केसरकर यांच्या लक्षात आले. 

सरस्वती विद्या मंदिरच्या आपल्या 1985-86 सालच्या वर्गमित्रांजवळ केसरकर यांनी ही खंत बोलून दाखविली. त्यानंतर रवी पाटील, जनार्दन पाटील, पावलू बारदेस्कर, नामदेव पाटील, विजय पाटील, नंदकुमार पाटील, विठ्ठल पाटील, बसवंत सनवक्के, प्रकाश पाटील, रामचंद्र देसाई या साऱ्या मित्रांनीही मदतीचा हात दिला. या सर्वांनी 10 हजार रुपये जमा केले. ही आर्थिक मदत बाळासाहेब यांच्याकडे सुपूर्द केली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com