गडहिंग्लजला लोकसहभागातून होताहेत 80 पाणंदी खुल्या

Gadhinglaj Opened 80 Roads Through Public Participation Kolhapur Marathi News
Gadhinglaj Opened 80 Roads Through Public Participation Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : गावाने ठरवून सकारात्मक दृष्टीने प्रशासनाला साथ दिली तर गावात काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून पाणंदी खुल्या करण्याच्या मोहिमेकडे पहावे लागेल. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी "वॉर पुटींग'वर सुरु केलेली ही मोहिम लोकांच्या "साथी हात बढाना...' या संकल्पनेतून पुर्णत्वाला जात असल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे. तालुक्‍यातील 61 गावातील 90 किलोमीटरच्या 80 पाणंदीचे काम सुरू असून यातील 50 हून अधिक पाणंदी खुल्या झाल्या आहेत. साडे आठ हजार शेतकऱ्यांना या पाणंदीमुळे लाभ होणार आहे. 

शासनाची एखादी मोहिम गावांमध्ये किती बदल घडवू शकते हे महाराजस्व अभियानातंर्गत सुरू असलेल्या महसूल लोकजत्रेच्या पाणंद खुली करण्याच्या मोहिमेने दाखवून दिले आहे. कोणीही सांगितले तरीसुद्धा इंचभरही शेतजमीन न देणारे शेतकरी शेतमालाच्या दळणवळणाची गरज ओळखून लोकसहभागातून पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करीत आहेत. यासाठी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाने सर्व मंडल अधिकारी, तलाठी यांनी गावपातळीवर ग्रामस्थांच्या बैठका घेवून पाणंद रस्त्याविषयी प्रबोधन करीत आहेत.

लोकसहभाग वाढविणे, सामंजस्याने तोडगा काढणे, शक्‍य त्या प्रमाणात यंत्रसामग्री पुरवण्याची मदतही प्रशासन करीत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. 
नकाशामध्ये असलेली बहुतांशी पाणंदी अतिक्रमणामुळे अरुंद झाल्या आहेत. यामुळे उसासह इतर शेतमालाची वाहतूक करणे मुश्‍किलीचे होते. आता पाणंदी अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांची चांगली सोय होणार आहे. गावागावात शेतकऱ्यांचा या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही पाहणी करुन या मोहिमेचे कौतूक केले आहे. 

नकाशात नसतानाही रस्ता 
नकाशातील पाणंदी या मोहिमेत अतिक्रमणमुक्त होतच आहेत, शिवाय नकाशात नसतानाही गरज असलेल्या ठिक़ाणी पाणंदी पूर्ण होत आहेत. शिप्पूर, ऐनापूर, अर्जूनवाडी, औरनाळ, बुगडीकट्टी, खणदाळ, कडलगे, दुंडगे, मुत्नाळ आदी गावात नकाशात नसतानाही शेतकऱ्यांनी रस्ते तयार केले. 

लवकरच शंभरवर पाणंदी खुल्या
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रेरणेने लवकरच शंभरवर पाणंदी खुल्या करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यामुळे पाणंदीतून खऱ्या अर्थाने आनंदी रस्ते तयार करण्याचा उद्देश सफल होणार आहे. 
- दिनेश पारगे, तहसीलदार 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com