esakal | मृतदेहांची होणारी हेळसांड आता थांबणार, "या' शहराला मिळाली शववाहिका
sakal

बोलून बातमी शोधा

Gadhinglaj Received The Hearse Kolhapur Marathi News

शववाहिका अभावी मृतदेहांची होणारी हेळसांड आता थांबणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून कोविड-19 निधीतंर्गत नवी शववाहिका आज दाखल झाली.

मृतदेहांची होणारी हेळसांड आता थांबणार, "या' शहराला मिळाली शववाहिका

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : शववाहिका अभावी मृतदेहांची होणारी हेळसांड आता थांबणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून कोविड-19 निधीतंर्गत नवी शववाहिका आज दाखल झाली. ही शववाहिका राष्ट्रवादीचे संघटक उदयराव जोशी यांच्या हस्ते नगराध्यक्षा स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आली. नव्या शववाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. 

कोरोना महामारीतील मृतांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी पालिकेवर आहे. पालिकेकडे जुनी शववाहिका आहे. परंतु, ती नादुरूस्त होत असते. तरीसुद्धा याच वाहनावर आतापर्यंत काम चालविण्यात आले. मध्यंतरी डंपरमधून काही मृतदेहांना स्मशानभूमीपर्यंत नेण्याची वेळ आली. दरम्यान, नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी मुश्रीफ यांच्याकडे नव्या शववाहिकेची मागणी केली होती. आढावा बैठकीतूनच मंत्री मुश्रीफ यांनी नियोजन मंडळाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून आमदार फंडातून तत्काळ पालिकेला शववाहिका देण्याची सूचना केली होती. शववाहिकेचे काम पूर्ण होवून आज प्रत्यक्ष ती सेवेत दाखल झाली आहे. यामुळे मृतदेहाची होणारी हेळसांड थांबण्यास मदत होणार आहे. 

आज प्रत्यक्ष ही शववाहिका पालिकेला सुपूर्द केली. माजी उपनगराध्यक्ष किरण कदम व नगराध्यक्षा कोरी यांच्या हस्ते वाहनाचे पूजन झाले. या वेळी उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे, सुरेश कोळकी, हारूण सय्यद, उदय परीट, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, लक्ष्मी घुगरे, सुनिता पाटील, रेश्‍मा कांबळे, शर्मिली पोतदार, तुषार यमगेकर, संतोष कांबळे, अमर मांगले, शारदा आजरी, उज्ज्वला कुंभार, राजू जमादार, अनिल गुरव, महेश देवगोंडा, महेश शिंदे, अवधूत रोटे, आकाश वाली, चंदू मेवेकर आदी उपस्थित होते. 

शहरवासियांतर्फे आभार
पालिकेकडे एक जुनी शववाहिका आहे. ती कोविड मृतांसाठी वापरली जाते. परंतु ती अपूरी पडत असल्याने मंत्री मुश्रीफ यांच्याकडे नव्या शववाहिकेची मागणी केली होती. मुश्रीफ यांनी तत्काळ मागणी पूर्ण करून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पालिका आणि शहरवासियांतर्फे त्यांचे आभार. 
- स्वाती कोरी, नगराध्यक्षा

संपादन - सचिन चराटी