गडहिंग्लजला टोमॅटो, वांगीचे भाव गडगडले 

Gadhinglaj Tomato, Eggplant Prices Fell Kolhapur Marathi News
Gadhinglaj Tomato, Eggplant Prices Fell Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील भाजीमंडईत टोमॅटो, वांगी, प्लॉवरची मागणीपेक्षा जास्त आवक झाल्याने भाव गडगडले आहेत. तुलनेत कोंथिंबिर, पालेभाज्या, लिंबूची आवक कमी असल्याने दर वधारले. वाढलेल्या सोयाबिनचा दर टिकून आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू झालेली चिंचेची आवक कायम आहे. सांगलीतून येणाऱ्या द्राक्षांचे दर स्थिर आहेत. जनावरांच्या बाजारात म्हैशी, शेळ्यांमेंढ्याना मागणी आहे. 

येथील बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या सौद्यांत आज टोमॅटोची तालुक्‍यातील भडगाव, मुगळी, जरळी या परिसरातून मोठी आवक झाली. गेल्या दिड महिन्यापासून आवक वाढल्याने दर घसरल्याचे भाजीपाला खरेदी विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. घाऊक बाजारात 60 रुपये दहा किलो असा दर आहे.

वांगी 100 रुपये दहा किलो तर प्लॉवर 50 ते 150 रुपये डझन आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे पालेभाज्या, कोंथिबिरीची आवक कमी आहे. परिणामी, दर वाढले आहेत. पेंढीचा 5 ते 10 रुपये दर आहे. बिन्स, दिडग्याचे दर तेजीत आहेत. दहा किलोचे भाव असे ः हिरवी मिरची, बिन्स 300, काकडी 250, दिडगा 500, दोडका 450, वरणा 300, ढब्बू 200 रुपये. 

सोयाबिनचा वाढलेला दर 5500 रुपये क्विंवटल असा टिकून आहे. लिंबू शेकडा 250 ते 350 रुपये असा दर आहे. किळकोळ बाजारात 2 ते 4 रुपयापर्यंत दर आहेत. फळबाजारात द्राक्षे 50 रुपये, माल्टा संत्री, चिकू 60 रुपये किलो आहेत.

सफरचंद 150 ते 200 रुपये किलो आहेत. कलिंगड आकारानुसार 20 ते 100 रुपयापर्यंत आहेत. जनावरांच्या बाजारात म्हैशींची 125 हुन अधिक आवक होती. 25 ते 95 हजारापर्यंत दर आहेत. शेळ्यांमेंढ्यांची शंभरहुन अधिक आवक होऊन 5 ते 15 हजारापर्यंत दर होते. 

कच्चा फणस दाखल... 
भाजीमंडईत कच्चा फणस दाखल झाला आहे. चंदगड, आजरा तालुका परिसरातून याची आवक होते. आकारानुसार 15 ते 25 रुपयापर्यंत दर आहेत. मुख्यतः मध्यम आकाराच्या फणसाला पसंती जास्त आहे. एप्रिल अखेर याची आवक सुरु असते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com