गडहिंग्लजच्या फुटबॉल संघाला मुंबईत उपविजेतेपद

Gadhinglaj's Football Team Finished Runners-up In Mumbai Kolhapur Marathi News
Gadhinglaj's Football Team Finished Runners-up In Mumbai Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : बांद्रा (मुंबई) येथे नवीन डिसोझा टर्फ मैदानावर झालेल्या 11 वर्षे वयोगट ग्रासरूट फुटबॉल स्पर्धेत गडहिंग्लजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्‍लबने उपविजेतेपद पटकावले. मुंबईच्या गोलर इंडियन फुटबॉल ऍकॅडमीने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तसेच, 13 वर्षे वयोगटातील स्पर्धेत संघाने उपांत्यफेरीपर्यंत धडक मारली. या संघाला फेयरप्ले पुरस्काराने गौरविण्यात आले. 

मुंबईच्या नेक्‍स स्पोर्टस्‌ने ड्रीम फुटबॉल लीग स्पर्धेचे आयोजन केले होते. या लीगमधील 11 व 13 वर्षे वयोगटाच्या स्पर्धेत डॉ. आंबेडकर क्‍लबने दोन संघ उतरविले होते. 11 वर्षे वयोगटाच्या संघाने साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात मुंबईच्या इंडिया रश ब्ल्यू संघाला 2-0 ने, तर दुसऱ्या सामन्यात इलाईट सॉकर स्कूल संघावर 1-0 असा निसटता विजय मिळविला. सेमी फायनलमध्ये स्पोर्टसिअन क्‍लब विरुद्ध आंबेडकर संघाने अधिक कौशल्याने खेळ साकारला.

दोन्ही संघांनी शॉर्ट पासेसवर भर दिल्याने सामना अधिक रंगतदार झाला. आंबेडकर संघाच्या आर्यन घारवे याने केलेल्या एकमेव सुरेख गोलमुळे संघाला फायनलपर्यंत मजल मारता आली. गोलर फुटबॉलविरुद्ध अंतिम सामना झाला. आंबेडकर संघाचा गोलरक्षक समर्थ गुंठे, महांतेश सुळकुडे यांनी डोळ्यांचे पारणे फेडले. हा चुरशीचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. यामुळे टायब्रेकरवर हा अंतिम सामना गोलर इंडियन संघाने 3-2 गोलफरकाने जिंकला. साखळी फेरीतील सामन्यात आर्यन घारवे याने दिलेल्या पासवर विक्रांत माने याने सुरेख गोल नोंदविला.

विजयी संघात समर्थ गुंठे (कर्णधार), महांतेश सुळकुडे (उपकर्णधार), विक्रांत माने, आर्यन घारवे, अलोक पाटील, रणवीर कुराडे, आयुष्य क्षीरसागर यांचा समावेश होता. आंबेडकर संघासाठी महेश सलवादे, भीमराव कोमारे, संतोष सलवादे, शेखर बारामती, पृथ्वीराज बारामती, पवन कांबळे यांच्यासह प्रशिक्षक रविकिरण म्हेत्री, चेतन खातेदार यांचे मार्गदर्शन लाभले. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com