गडहिंग्लजच्या काळभैरवाची यात्रा रद्द

Gadhinglaj's Kalbhairava Yatra Canceled Kolhapur Marathi News
Gadhinglaj's Kalbhairava Yatra Canceled Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : वाढत्या कोरोना संसर्गामुळे येथील ग्रामदैवत व कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री काळभैरव देवाची यात्रा अखेर आज रद्द करण्यात आली. दरवर्षी पाच लाख भाविकांच्या हजेरीने होणाऱ्या यात्रेचे सर्व धार्मिक विधी यंदा केवळ 50 मानकरी, सेवेकरी आणि प्रमुखांच्या उपस्थितीत होतील. देवाच्या धार्मिक विधींसह पालखी सोहळा आणि शासकीय पूजेचे स्थानिक केबलद्वारे "लाईव्ह' प्रक्षेपण केले जाणार असल्याने भाविकांना घरबसल्या देवाचे दर्शन होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, 28 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत काळभैरवाचे मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. मंदीराकडे जाणारे एक किलोमीटर परिसरातील सर्व रस्ते ब्लॉक केले जातील. 
यात्रा रद्द झाल्याने केवळ देवाचे धार्मिक विधी मोजक्‍या 50 जणांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन आजच्या बैठकीत केले. प्रांताधिकारी विजया पांगारकर अध्यक्षस्थानी होत्या. तहसीलदार दिनेश पारगे, पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, गटविकास अधिकारी शरद मगर, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते. 

श्रीमती पांगारकर म्हणाल्या, ""मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत देवाचा धार्मिक उत्सव होईल. यात्रेच्या आदल्या दिवशी पालखी सोहळ्याला पाच लोकांच्या हजेरीत आरती होईल. शासकीय पूजा सात जणांच्या उपस्थितीत तर एक जण दिपमाळ प्रज्वलीत करेल. प्रथेनुसार पूजेनंतर केवळ एका माहेरवाशिणीकडून देवाला नैवेद्य देता येईल. धार्मिक विधीमध्ये मानकऱ्यांचा सन्मान राखला जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर परिसरात अग्निशमन दल, पाणी व्यवस्था, आरोग्य पथक, वीज पुरवठ्यासाठी महावितरणचा प्रतिनिधी उपलब्ध ठेवण्यात येईल. आदर्श धार्मिक उत्सव साजरा करुन भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.'' 

उपअधीक्षक इंगळे म्हणाले, ""लोकांची गर्दी होवू नये म्हणून पोलिसांकडून मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले जातील. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त राहणार असून पेट्रोलिंगची पथकेही तैनात असतील."" यावेळी मारुती राक्षे, खातेदार सुधीर पाटील, मानकरी किरण डोमणे, अमर डोमणे, पुजारी अश्‍विन गुरव, सरपंच सतीश कोळेकर, सदस्या सुनिता दळवी, विश्‍वास खोत, ग्रामसेवक श्री. तोरस्कर, तलाठी अजय किल्लेदार उपस्थित होते. 

ठळक मुद्दे 
- पालखी सोहळादिनी सहा जण पालखी ट्रकमधून डोंगराकडे नेतील 
- पालखी सोहळ्यादिवशी रविवारी आठवडा बाजार बंद राहील 
- मुरगूडची पालखीही चौघे जण वाहनातून डोंगरावर घेवून येतील 
- मंदिराकडे जाणारे सर्व मुख्यसह चोर रस्तेही बंद करणार 
- भाविकांच्या दंडवताचा विधी रद्द, दोन दिवस खासगी वाहनांना बंदी 
- मंदिर परिसरात एकही दुकान नसणार 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com